Kim Kardashian and Kanye West. (Photo Credits: Instagram)

आपल्या मादक अदा, सेक्सी फिगर आणि हॉट व बोल्ड फोटोज-व्हिडीओद्वारे चाहत्यांना घायाळ करणारी किम कर्दाशिअन (Kim Kardashian) चौथ्यांदा आई बनली आहे. किम आणि तिचा नवरा केने वेस्ट (Kanye West) यांना सरोगसीच्या (Surrogacy) माध्यमातून अपत्यप्राप्ती झाली आहे. शुक्रवारी, 10 मे रोजी या बाळाचा जन्म झाला असून, बाळ बाळंतीण दोघेही सुखरूप आहेत. पुत्रप्राप्तीचा आनंद किमने ट्विटद्वारे आपल्या चाह्त्यांपर्यंत पोहचवला. किमच्या तिसऱ्या मुलीचा जन्मही सरोगसीच्याच माध्यमातून झाला होता.

38 वर्षीय किम आजही तिच्या फिगरमुळे भल्याभल्यांची झोप उडवते. नुकताच मेट गाला (Met Gala 2019) मध्ये आपला जलवा दाखवून प्रकाशझोतात राहिलेली किम, आता या बाळाच्या जन्मामुळे चर्चेत आली आहे. किम आणि केने हे आधीच तीन मुलांचे, नॉर्थ (5 वर्षे), सेंट (3 वर्षे) आणि शिकागो (1 वर्षे) चे पालक आहेत. आता यामध्ये चौथ्या मुलाची भर पडली. पेज सिक्स (Page Six) ने दिलेल्या वृत्तानुसार शिकागोच्या वेळी ल रीना हेन्स (La’Reina Haynes) या महिलेने त्यांची सरोगसीसाठी मदत केली होती. मात्र आता ही महिला स्वतःच्या मुलाला जन्म देणार असल्याने या चौथ्या अपत्यासाठी किमने दुसऱ्या एका महिलेचा शोध घेतला. (हेही वाचा: या सौंदर्यवती ठरल्या आहेत इंटरनेटवरील सर्वात धोकादायक सेलिब्रिटी)

किमने ट्विट करत या मुलाच्या आगमनाची बातमी दिली, तसेच सध्या हा शिकागोसारखा दिसत आहे, मात्र लवकरच त्याच्यामध्ये बदल होईल असेही सांगितले. किमला नेहमीच आपल्याला चार मुले असावीत असे वाटायचे, आता तिची ही इच्छा आणि स्वप्न पूर्ण झाले आहे. मदर्स डेच्या पार्श्वभूमीवर या मुलाचा जन्म झाल्याने किमचा आनंद द्विगुणीत झाला आहे. आता तिच्या चाहत्यांना उत्सुकता आहे ती या मुलाच्या दर्शनाची आणि त्याच्या नावाची.