कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रसार सुरु झाल्यापासून स्वसंरक्षणासाठी बाजारात मास्क (Mask) ची मागणी वाढली आहे. अशावेळी अनेक जण परिस्थितीचा फायदा घेत चढ्या भावाने मास्कची विक्री करत आहेत. अगदी पातळ कपड्याचा मास्क सुद्धा नेहमीपेक्षा वाढीव किमतीत विकला जात आहे. हीच गरज लक्षात घेता आता खादी आणि ग्रामोद्योग कमिशन Khadi& Village Industries Commission) तर्फे माफक दरात सिल्कच्या मास्कची (Silk Mask) निर्मिती करून विकण्याचा व्यवसाय सुरु करण्यात आला आहे. याबाबत कमिशनच्या मुख्य अधिकाऱ्यांनी माहिती देत सांगितले की, हे सिल्कचे मास्क अत्यंत टिकाऊ आणि सोयीस्कर असणार आहेत. यामध्ये 2 लेयर कॉटन आणि 1 वरचा लेयर सिल्क असे शिवले जाणार आहे. शनिवारी हे मास्क लाँच करण्यात आले असून आता लवकरच विक्रीसाठी ते बाजारात उपलब्ध होणार आहेत. मुंबई पोलिसांनी Robert Pattinson चा बॅटमॅन लूक वापरत COVID-19 मध्ये मास्क कसा वापरू नये याची दिली माहिती (View Pic)
सिल्क च्या मास्कचे वैशिष्ट्य असे की, हे मास्क धुवून पुन्हा वापरता येतील असे आहेत, तसेच कॉटनचा वापर असल्याने त्वचेला याची कोणतीही हानी होणार नाही हे निश्चित आहे. या मास्कचा वापर केल्यावर त्यांचे विघटन करणेही तितकेच सोप्पे आहे. आकर्षक रंगात हे मास्क उपलब्ध असणार आहेत. याशिवाय या कंल्पनेमागील एक महत्वाची बाब अशी की, हे सर्व मास्क हॅण्डमेड आहेत म्हणजेच या कामासाठी मजुरांची नेमणूक करून त्यांच्याकडून या मास्कचे शिवणकाम करण्यात आले आहे. यातून लॉक डाऊन काळात रोजगाराचा एक मार्ग निर्माण करण्यात आला आहे तर प्रत्यक्ष हाताने शिवले असल्याने मास्कची गुणवत्ता सुद्धा अगदी चोख आहे.
पहा ट्विट
We've launched special category of silk masks y'day. It has 2 layers of cotton&1 upper layer of silk. It's reusable, washable,biodegradable&skin-friendly. Hand spun&hand weaved fabric is being used which is also creating employment: Chairman, Khadi& Village Industries Commission pic.twitter.com/Hd28jYvHi1
— ANI (@ANI) May 24, 2020
दरम्यान, लॉक डाउनच्या सध्याच्या टप्प्यात जेव्हा अनेक व्यवसाय पुन्हा सुरु होण्याच्या मार्गावर आहेत तिथे कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर रुजू होतानामास्क वापरणे गरजेचे आणि अनिवार्य असणार आहे. यासाठी N95 किंवा अन्य अद्ययावत मास्कच वापरावा असे काही गरजेचे नाही मात्र निदान इतरांशी थेट संपर्क होणार नाही अशा पद्धतीने आपले तोंड आणि नाक कव्हर करणे आवश्यक आहे. यासाठी हा सिल्क मास्क पर्याय फायदेशीर ठरू शकतो.