केरळ मध्ये लॉटरीचं तिकीट विकलं न गेल्याने चिंतेत असलेल्या विक्रेत्यालाच लागलं 12 कोटीचं बक्षीस; असा झाला रातोरात करोडपती!
Maharashtra Lottery | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

केरळ स्टेट लॉटरीज (Kerala State Lotteries) ही केरळ राज्य सरकारची अधिकृत लॉटरी आहे. या अंतर्गत रोज एक लॉटरी आणि त्याची सोडत जाहीर केली जाते, विजेत्यांना नियमित 70-80 लाख जिंकण्याची संधी असते. पण नुकतीच या लॉटरीच्या सोडतीमध्ये चक्क एका तिकीट विक्रेत्याच नशीब फळफळलं आहे. रातोरात हा तिकीट विक्रेता कोट्याधीश झाला आहे. दरम्यान हा भाग्यवान विजेता आणि लॉटरी तिकीट विक्रेता आहे 46 वर्षीय सैफुद्दीन ए (Sharafudeen A).

सैफुद्दीन ए ला केरळ सरकारची 12 कोटीची Christmas-New Year lottery लागली आहे. खरंतर या लॉटरीची सारी तिकीटं विकली न गेल्याने तो थोडा चिंतेत होता. मात्र त्याच्याकडे उरलेलं तिकीटच भाग्यवान विजेत्याचं होतं. त्याने सहज तिकीट स्क्रॅच केलं आणि त्याचा नंबरच विजेता म्हणून भाग्यवान नंबर असल्याचं त्याच्या लक्षात आहे.

दरम्यान सैफुद्दीन ए ने कोविड संकटकाळात अत्यंत हालाखीचे दिवस पाहिले. तरुण वयामध्ये आखाती देशांमध्ये नोकरी केल्यानंतर आता सैफुद्दीन मूळ गावी परतले आहे. त्याच्या घरात सहा सदस्य आहेत. दरम्यान कोल्लम जिल्ह्यातील कार्यानाकावूजवळच्या अरविंधर्मपूरममध्ये सरकारी मालकीच्या जमीनीवर अगदी लहानशा घरामध्ये ते राहतात. पण आता कोट्याधीश झाल्यानंतर त्याचं सार जीवन पालटणार आहे. Maharashtra Natal New Year Bumper Lottery Results 2021: महाराष्ट्र नाताळ न्यू ईयर भव्यतम लॉटरी निकाल यंदा 6 जानेवारी 2021 दिवशी;कधी, कुठे पहाल निकाल?

मीडीयाशी बोलताना त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता जिंकलेल्या पैशातून त्यांना कर्ज फेडायचं आहे, एक घर घ्यायचं आहे तसेच छोटाशा व्यवसाय सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे.

सैफुद्दीन यांनी मंगळवारी Thiruvananthapuram मध्ये Lottery Directorate समोर आपलं तिकीट सादर केलं आहे. 46 वर्षीय सैफुद्दीन यांना 7.50 कोटी मिळतील. त्यांच्या बक्षीसाच्या रक्कमेतून 30% टॅक्स आणि 10% एजंट कमिशन कापलं जाणार आहे.