Maharashtra Natal New Year Bumper Lottery Results 2021:  महाराष्ट्र नाताळ न्यू ईयर भव्यतम लॉटरी निकाल यंदा 6 जानेवारी 2021 दिवशी;कधी, कुठे पहाल निकाल?
Lottery | (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्रात दिवाळी भव्यतम लॉटरीनंतर महाराष्ट्र नाताळ न्यू ईयर भव्यतम लॉटरी (Maharashtra Natal New Year Bumper Lottery Results 2021)चे वेध अनेकांना लागले आहेत. महाराष्ट्र राज्य सरकार कडून जारी करण्यात येणार्‍या अधिकृत लॉटरीच्या निकालांमध्ये या लॉटरीचा समावेश आहे. सध्या या लॉटरीच्या तिकीटांची विक्री सुरू असून जानेवारी 2021 च्या पहिल्या आठ्वड्यात त्याचा निकाल जाहीर केला जाणार आहे. ऑनलाईन देखील त्याचा ड्रॉ काढला जात असल्याने ज्यांनी यंदा महाराष्ट्र नाताळ न्यू ईयर भव्यतम लॉटरी चे तिकीट काढले असेल त्यांना हा निकाल महाराष्ट्र राज्य सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर देखील पाहता येणार आहे.

यंदा महाराष्ट्र नाताळ न्यू ईयर भव्यतम लॉटरी चा निकाल कधी आहे? किती वाजता जाहीर होणार? ते अगदी कसा, कुठे पहाल? इथपर्यंतचे सारे अपडेट्स तुम्हांला जाणून घ्यायचे असतील तर खालील माहिती नक्की वाचा.

महाराष्ट्र नाताळ न्यू ईयर भव्यतम लॉटरी 2021 सोडत अपडेट्स

लॉटरीचं नाव - महाराष्ट्र राज्य लॉटरी

स्कीमचं नाव - महाराष्ट्र नाताळ न्यू ईयर भव्यतम लॉटरी

ड्रॉ ची तारीख - 6 जानेवारी 2021

ड्रॉ ची वेळ - संध्याकाळी 5 च्या पुढे

अधिकृत संकेतस्थळ - lottery.maharashtra.gov.in

दरम्यान महाराष्ट्र नाताळ न्यू ईयर भव्यतम लॉटरी 2021 च्या विजेत्यांच्या यादीमध्ये पहिलं बक्षीस 50 लाख रूपयांचं आहे, दुसरं बक्षीस 10 लाख तर तिसरं बक्षीस 4 लाख रूपयांचं आहे. या लॉटरीची 1 लाख तिकीटंं उपलब्ध आहेत. तर4 अंकी भाग्यवान नंबर वरून विजेता निवडला जाईल.  या लॉटरीच्या तिकीटाची किंमत प्रत्येकी 100 रूपये आहे. लॉटरी बाबतचे अन्य तपशील नागरिकांना महाराष्ट्र राज्य सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येतील.