Kashmera Shah Bold Photoshoot: 48 वर्षीय अभिनेत्री कश्मीरा शाहने बिकिनीमध्ये केले फोटोशूट, म्हणाली- 'मी Hot असल्याबद्दल मला दोष देऊ नका' (See Photos)
कश्मीरा शाह (Photo Credits: Instagram)

कॉमेडियन कृष्णा अभिषेकची (Krushna Abhishek) पत्नी कश्मीरा शाह (Kashmera Shah) हिने नुकतेच तिचे नवीन फोटोशूट केले आहे. ज्यामध्ये तिची फिट बॉडी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. कश्मीराने फार मोठ्या प्रमाणावर आपले वजन कमी केले आहे हे या फोटोवरून दिसून येत आहे. कश्मीराने हे फोटोशूट बिकिनीवर केले आहे व इन्स्टाग्रामवर आपले फोटोज शेअर केले आहेत. सध्या हे फोटोज सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. फिकट निळ्या रंगातील बिकिनीमधील हे फोटोशूट एका स्विमिंग पूलच्या काठावर केले आहे. हे फोटो शेअर करताना ती लिहिते, ‘मी हॉट असल्याबद्दल मला दोष देऊ नका, माझ्यावरून तुम्ही तुमच्या नजरा का हटवू शकत नाहीत हे स्वतःला विचार.’

 

View this post on Instagram

 

Pain Perseverance and Patience are the Three Ps to a great body.

A post shared by Kashmera Shah (@kashmera1) on

कृष्णा अभिषेकची पत्नी कश्मीरा शाह तिच्या रागामुळे नेहमीच चर्चेत असते, पण आता कश्मीरा तिच्या ट्रान्स्फॉर्मेशनमुळे चर्चेत आली आहे. जेथे लॉकडाऊनमध्ये बसून लोकांचे वजन वाढले आहे, तिथे कश्मीराने तिचे 10 किलो वजन कमी केले आहे. आता सोशल मिडियावरील हे फोटो पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. फोटो शेअर करताना, कश्मीराने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'बदलाची सुरुवात स्वतःपासून झाली पाहिजे. आपण स्वत: ला बदलू इच्छित असाल तर त्याची सुरुवात स्वतःपासून करा.’ (हेही वाचा: Sherlyn Chopra Hot Video: शर्लिन चोपड़ा चा नवीन बिकिनी व्हिडिओ आला समोर; एकट्यातचं पहा)

यासोबतच तिने एक व्हिडिओदेखील शेअर केला आहे. ज्याबाबत ती म्हणते, ‘स्वतःला आश्चर्य वाटेल असे काहीतरी करा आणि लोकांना प्रेरित करा. आता ही स्वतःला बदलण्याची वेळ आहे.’ अभिनेत्री कश्मीरा शाहने जे बिकिनीमध्ये हॉट फोटोशूट केले आहे, त्यामध्ये ती स्विमिंग पूलच्या बाजुला बसलेली दिसत आहे. फोटोमध्ये ती आपल्या फिट बॉडीला फ्लॉन्ट करताना दिसत आहे. कश्मीराने निळ्या रंगाची बिकिनी व मल्टीकलर कोट घातला आहे. मेकअप आणि हेअरमुळे तर ती खूपच सुंदर आणि स्टायलिश दिसत आहे.