Nagaraja Kharvi या शिक्षकाने मंगळूरू मध्ये पद्मासनात 1 किमी  पोहून India Book of Records मध्ये नोंदवला विक्रम
पद्मासनात पोहणारे शिक्षक। Photo Credits: Twitter / ANI

एका शिक्षकाने आपलं पोहण्यातलं नैपुण्य दाखवत 1 किमीचा प्रवास 'पद्मासना' मध्ये पार केला आहे. यावेळेस त्यांचे पाय पद्मासन स्थितीमध्ये साखळीने बांधण्यात आले होते. Nagaraja Kharvi Kanchugodu असं त्यांचं नाव असून पेशाने ते शिक्षक आहेत. यापूर्वी देखील त्यांनी आपल्या पोहण्याच्या कौशल्याने अनेकांचे लक्ष वेधलं होते. पण आज त्यांनी विक्रम केला आहे. दरम्यान बंटवल तालुक्यातील कालमंजा या भागात नागराजा हे हायर प्रायमरी शाळेचे शिक्षक आहेत.

Nagaraja Kharvi Kanchugodu यांनी तन्नीरभावी या भागात समुद्रकिनारी 1 किमी प्रवास पद्मासन अवस्थेमध्ये अवघ्या 25 मिनिटं 16 सेकंद या वेळात पूर्ण केला आहे. त्यांचा प्रवास सकाळी 8 वाजून 55 मिनिटांनी सुरू झाला आहे तर समुद्र किनारी 9 वाजून 20 मिनिटांनी परतले.

ANI Tweet

नागराजा यांच्या या पद्मासनात पोहण्याच्या विक्रमाची India Book of Records मध्ये नोंद करण्यात आली आहे. नागराजा खार्वी यांच्या या विक्रमाचे Pradeep D'Souza हे दक्षिण कन्नड जिल्हा स्पोर्ट्स विभागाचे अधिकारी साक्षीदार होते.

नागराजा खार्वी यांनी 2 सुवर्ण आणी 1 ब्रांझ पदक राष्ट्रीय स्तरावरील स्विमिंग स्पर्धेमध्ये मिळवले आहे. मागील वर्षी जानेवारी महिन्यात ही स्पर्धा गुजरातच्या वडोदरा मध्ये पार पडली. दरम्यान योगासनं आणि स्विमिंग या दोघांचा मिलाफ करत शारिरीक स्वास्थ्यासाठी त्याचा कसा फायदा होऊ शकते याबाबत जनजागृती करण्याचा त्यांचा मानस आहे.