Luana Alonso | (Photo Credits: instagram)

Paraguayan Swimmer Luana Alonso Controversy: लुआना अलोन्सो, पराग्वेची अवघी 20 वर्षांची जलतरणपटू. सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरली आहे. चर्चेस कारण ठरले आहे तिने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ (Paris Olympic 2024) स्पर्धेत केलेले वर्तन. होय, तिला तिच्या वर्तनास कारणीभूत ठरवून स्पर्धेतून अपात्र तर ठरविलेच आहे. पण, आता तिला चक्क ऑलिम्पिक गाव (Olympic Village) सोडण्यासही सांगण्यात आले आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कथितरित्या 'अयोग्य' वातावरण तयार केल्याने तिच्यावर ही कारवाई केल्याचे समजते. ज्यामुळे ती महिलांच्या 100 मीटर बटरफ्लाय सेमीफायनलसाठी पात्र ठरू शकली नाही.

लुआना अलोन्सो आणि वाद

प्रसारमाध्यमांतून चर्चा आहे की, लुआन अलोन्सो हिस तिच्या सौंदर्यामुळे स्पर्धेस मुकावे लागले. पण, तिच्यावर कारवाई होण्याबाबत पॅराग्वेच्या ऑलिम्पिक समितीच्या प्रमुख लॅरिसा शेरर यांनी वेगळेच कारण सांगितले, त्यांनी सांगिले की, पॅरिसमध्ये तिचे असणे अतिशय अयोग्य वातावरण निर्माण करत आहे. त्यामुळे स्पर्धेसाठी आलेल्या इतर खेळाडू आणि प्रेक्षकांवरही परिणाम होतो आहे. दरम्यान, शेरर यांनी पुढेसांगितले की, अलोन्सोने ॲथलीट्सचे गाव (ऑलिम्पिक) स्वत:हून सोडले आहे. तिने घेतलेल्या निर्णयाबाबत आम्ही आभार व्यक्त करतो, असेही त्यांनी म्हटले. (हेही वाचा, सुंदर असल्यामुळे पॅराग्वेची तरुण महिला जलतरणपटू Luana Alonso ला पाठवले घरी)

Luana Alonso
Luana Alonso | (Photo Credits: instagram)

जलतरण क्रीडाप्रकारातून निवृत्ती

पॅरिस ऑलिम्पीक 2024 मध्ये 27 जुलै रोजी महिलांच्या 100 मीटर बटरफ्लाय हीट्समध्ये पुढे जाण्यात अयशस्वी ठरल्यानंतर अलोन्सोने या क्रीडाप्रकारातून आपली निवृत्ती जाहीर केली.

Luana Alonso
Luana Alonso | (Photo Credits: instagram)

कोण आहे लुआना अलोन्सो?

लुआना अलोन्सो, ही पॅराग्वेची एक स्पर्धात्मक जलतरणपटू आहे. ती 9 सप्टेंबर 2004 रोजी जनमाला आली. जलतरण क्रीडा प्रकारातील बटरफ्लाय स्ट्रोक या प्रकारात तिचे विशेष प्राविण्य आहे. पॅराग्वेमध्ये तिने 100 मीटर बटरफ्लायमध्ये राष्ट्रीय विक्रम प्रस्तापीत केला आहे. ती अमेरिकेतील डॅलस येथील सदर्न मेथोडिस्ट विद्यापीठाचा विद्यार्थीनी आहे. तिने यापूर्वी व्हर्जिनिया टेकमध्ये एका सेमिस्टरसाठी शिक्षण घेतले होते. अलोन्सोने वयाच्या 17 व्या वर्षी 2020 टोकियो ऑलिम्पिकमध्ये पॅराग्वेचे प्रथम प्रतिनिधित्व केले आण 100 मीटर बटरफ्लाय स्पर्धेत 28 वे स्थान पटकावले. (हेही वाचा, Vinesh Phogat Retires: 'कुस्ती जिंकली, मी हरले आता माझ्यात ताकद नाही'; विनेश फोगाट ने भावनिक पोस्ट लिहित जाहीर केली निवृत्ती)

Luana Alonso
Luana Alonso | (Photo Credits: instagram)

ऑलिम्पिकपेक्षा डिस्नेलँडमध्येच घालवला अधिक वेळ

पॅरिस ऑलिम्पिक मध्ये यंदा तिला दुसऱ्यांदा संधी मिळाली. मात्र, दुसऱ्यांदा ऑलिम्पिकमध्ये सहभागी होताच ती खेळापेक्षा इतर बाबींमुळेच चर्चात आली. तिच्या दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये, अलोन्सो हीटमध्ये बाहेर पडली, सहाव्या स्थानावर राहिली. तिने युथ ऑलिम्पिक गेम्स, साउथ अमेरिकन गेम्स आणि वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्येही भाग घेतला आहे. ऑलिम्पिकपूर्वी, अलोन्सोने युनायटेड स्टेट्सचे प्रतिनिधित्व करण्याची इच्छा व्यक्त केली. स्थानिक मीडियाने वृत्त दिले की तिने तिच्या टीममेट्सला पाठिंबा देण्याऐवजी डिस्नेलँडमध्ये वेळ घालवला.

Luana Alonso
Luana Alonso | (Photo Credits: instagram)

अलोन्सो कडून आरोपांचे खंडण

डेलीमेलने दिलेल्या वृत्तानुसार, अलोन्सो ही इतर स्पर्धकांचे लक्ष विचलित करत होती. तिचे कपडे आणि हावभाव, हालचाली, छायाचित्रांसाठी दिलेली पोझ यांमुळे इतर खेळाडूंचे लक्ष विचलित होत होते. तसेच, स्थानिक पातळीवर सामाजिक वातावरणही भंग होत होते. अलोन्सोने मात्र तिच्यावरील आरोपांचे खंडण केले आहे. तब्बल 898,000 इंस्टाग्राम फॉलोअर्ससह असलेल्या पेजवरुन खुलासा करताना तिने म्हटले आहे की, "मला कधीही बाहेर काढले गेले नाही किंवा कोठूनही हाकलण्यात आले नाही, कृपया खोटी माहिती पसरवणे थांबवा." दरम्यान, उपांत्य फेरीसाठी पात्र ठरण्यात अयशस्वी झाल्यानंतर, अलोन्सो म्हणाला, "ही माझी शेवटची शर्यत होती. मी जलतरणातून निवृत्त होत आहे."