14 वर्ष तुरुंगवास भोगून बाहेर आल्यावर 'तो 'बनला डॉक्टर; 39 व्या वर्षी झाली स्वप्नपूर्ती
Subhash Patil (Photo Credits: ANI)

चुकतो तो माणूस आणि चूक सुधारतो तो देव माणूस असं म्हणतात, या वाक्याचे मूर्तिमंत उदाहरण कर्नाटक (Karnataka)  मधील कलबुर्गी (Kalburgi) येथे पाहायला मिळाले आहे. सुभाष पाटील (Subhash Patil)  नामक एका व्यक्तीने 14 वर्षे तरुंगात राहून शिक्षा भोगल्यावर बाहेर येताच आपले डॉक्टर बनण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. MBBS पूर्ण केल्यावर मागील एका वर्षांपासून त्यांनी एका रुग्णालयात इंटर्नशिप सुद्धा पूर्ण केली आहे. साधारणतः आयुष्यात एक चुकीचं वळण येताच अनेकजण त्यात व्हतं भलत्यादिशेला निघून जातात, मात्र कितीही अवधी लोटला असला आणि आपण आपल्यात सुधारणा करण्याचे ठरवले तर कोणतीही ताकद आपल्याला अडवू शकत नाही, परिणामी आयुष्याच्या कोणत्याही टोकापासून एक नवीन सुरुवात करता येणे सहज शक्य आहे आणि सुभाष पाटील यांनी खरोखरच हे सिद्ध केलं आहे.

प्राप्त माहितीनुसार, सुभाष पाटील यांना लहानपणापासून डॉक्टर व्हायचे होते, 1997 साली त्यांनी MBBS शिक्षणात प्रवेश घेतला मात्र 2002 मध्ये त्यांच्याकडून घडलेल्या एका हत्येमुळे त्यांना 14 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. या एकटेपणात त्यांनी पुन्हा स्वतःचे परीक्षण केलं. तुरुंगातील ओपीडी मध्ये सुदधा त्यांनी काम करणे सुरु केले, त्यांच्या सुधारलेल्या व्यक्तिमत्वाकडे पाहताच 2016 मध्ये त्यांना स्वातंत्र्य दिनी पोलिसांकडून सुटका देण्यात आली.

ANI ट्विट

दरम्यान,तुरुंगातून बाहेर पडताच सुभाष यांनी आपल्या आयुष्याची दुसरी खेळी सुरु केली आणि 2019 मध्ये आपली MBBS ची डिग्री पूर्ण करून सुभाष पाटील डॉक्टर बनले. पोलिसांच्या माहितीनुसार, केंद्रीय तुरुंगातील कैद्यांच्या उपचार कार्यात सुभाष नेहमीच मदत करायचे, याच कामासाठी 2008 साली त्यांना आरोग्य विभागाकडून सन्मानित देखील करण्यात आले आहे.