Instagram Top Trend 2018 : इन्स्टाग्रामवर भारतीयांकडून Heart Emoji द्वारे 2018 मध्ये प्रेमवर्षाव
इंन्स्टाग्राम ( फोटो सौजन्य - फेसबुक )

Instagram Top Trend 2018 : सोशल मीडियावर (Social Media) सध्या वर्षाअखेरीस कोणते ट्रेंड(Trend) चालू आहेत याची माहिती नुकतीच गुगलने (Google) जाहिर केली आहे. तर इन्स्टाग्राम (Instagram) वर यंदाच्या वर्षात लैंगिक शोषणाविरुद्ध वापरला गेलेला #metoo बद्दलच्या खूप पोस्ट इन्टाग्रामवर पाहिल्या मिळाल्या आहेत. तसेच मीटूनंतर #timesup या हॅशटॅगचा 2018 मध्ये जास्त वापर करण्यात आल्याचा अहवाल सादर करण्यात आला आहे.

भारतीयांनी(India) इन्स्टाग्रामवर 2018 मध्ये प्रेम आणि उत्साही असलेल्या पोस्ट शेअर केल्या आहेत. तर हॅशटॅगच्या कॅटेगरीमध्ये भारतीयांकडून #love याचा प्रचंड उपयोग केला गेला आहे. त्याचबरोबर एकापेक्षा अधिक वेळा प्रेमाचे संकेत असलेल्या हृदयाचे स्टिकरही खूप वेळा वापरले आहे. तर भारतात सर्वांत जास्त नेटकऱ्यांच्या पसंदीस अनुष्का आणि विरट कोहली या दोघांचा इन्स्टाग्रामवरील फोटो खूप चर्चेत आहेत. या दोघांच्या फोटोला चाहत्यांकडून 36 लाखांपेक्षा जास्त प्रेम मिळाले आहे.तर तिसऱ्या क्रमांकावर क्रिकेटर महेंद्र सिंग धोनी याच्या परिवाराचा फोटो चर्चेत आहे.

इन्स्टाग्रामवरील सर्वात जास्त चर्चेचा विषय

- संपूर्ण वर्षभरात #metoo संदर्भातील पोस्ट खूप दिसून आल्या.

-2018 च्या टॉप ट्रेंडमध्ये विरुष्का (Virushka) यांच्या फोटोला प्रचंड पसंदी मिळाली आहे.

-तर इन्स्टाग्रामवरील फेस फिल्टरमधील हार्ट आइजचा (Heart Eye) जास्त उपयोग केला आहे.

- जगामधील सर्वात आनंददायी जागा- डिझनीलँड, टोकियो

-टॉप कम्युनिटी ट्रेंड- ASMR (मानसिक आराम देणाऱ्या पोस्ट/व्हिडिओ)

-व्हायरल डान्स चॅलेंज- #inmyfeelingschallenge

-भारतात सर्वात जास्त पोस्ट करणारी शहर- मुंबई, दिल्ली, बंगळुरु

-भारतातील तीन टॉप हॅशटॅग- #love #instagood #fashion