Indian Independence Day 2020: आज, भारत आपला 74 वा स्वातंंत्र्य दिन साजरा करत आहे, काही वेळापुर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्व्जारोहण करण्यात आले आहे. कोरोनाच्या संंकटामुळे यंंदा किंंचित साध्या स्वरुपात हा सोहळा साजरा होणार आहे, मात्र मध्यरात्रीपासुनच सोशल मीडियाच्या माध्यमातुन अनेकांनी शुभेच्छा देत ऑनलाईन सेलिब्रेशन मात्र जोरदार सुरु केले आहे. भारताचा स्वातंत्र्यदिन 2020 साजरा करण्यासाठी गूगल ने सुद्धा खास डूडल (Google Doodle) साकारुन शुभेच्छा दिल्या आहेत. आपण पाहु शकता या डूडल मध्ये भारतीय कलेचे दर्शन घडवुन देण्यात आले आहे. या डूडल ची खासियत म्हणजे आजचे हे सुंदर डूडल मुंंबईत राहणार्या सचिन घाणेकर (Sachin Ghanekar) या मराठमोळ्या कलाकाराने साकारले आहे. जवाहरलाल नेहरू यांंनी A Tryst With Destiny भाषणाने केली होती स्वातंत्र्याची घोषणा, पाहा 'तो' सुवर्ण क्षण (Watch Video)
तुम्ही गूगल सुरु करताच सुरुवातीलाच तुम्हाला हे डूडल दिसेल ज्यावर क्लिक केल्यास आणखीन सविस्तर माहिती देणारे पेज सुरु होईल. या डूडल मध्ये आपण पाहु शकतो की सहा फ्रेम्स मध्ये भारताच्या संगीत व नृत्यकलेचे विविध प्रकार दाखवण्यात आले आहेत, तुतारी, शहनाई, ढोल,वीणा, सारंंगी, बासरी अशा वाद्यांमधुन गूगलची अक्षरे बनवण्यात आली आहेत. भारताला लाभलेला सांगितिक वारसा हा 6000 वर्ष जुना आहे.
भारताचा स्वातंत्र्यदिन 2020 गूगल डूडल
दरम्यान, Indian Independence Act, 1947 नंंतर ब्रिटीशांच्या 150 वर्षाच्या जुलमातुन मुक्त होत भारतामध्ये लोकशाहीला सुरूवात झाली. भारताची लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. प्रसंगी बलिदान देऊन, चळवळ, मोर्चे, सत्याग्रह नानाप्रकारे मिळवलेल्या या स्वातंंत्र्याच्या समस्त देशवासियांंनी कोट्यावधी शुभेच्छा!