'या' देशातील मुलींशी लग्न केल्यावर सरकार देणार 5 हजार डॉलर्स !
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: Facebook)

लग्न केल्यावर पैसे मिळतील, असे जर तुम्हाला कोणी सांगितले तर तुम्हाला खरं वाटणार नाही. पण या पृथ्वीतलावर असा एक देश आहे. त्या देशातील मुलींसोबत लग्न केल्यास सरकार तुम्हाला पैसे देणार आहे. तो देश आहे आइसलँड. निसर्गसौंदर्याने नटलेला स्वर्गवत वाटावा असा हा देश. या देशाची लोकसंख्या अतिशय कमी आहे. त्यामुळेच या देशातील सरकारने ही ऑफर सादर केली आहे.

आईसलँडमधील मुलीशी केल्यास सरकार प्रत्येक महिन्याला 5 हजार डॉलर्स म्हणजेच 3 लाख 33 हजार रुपये देणार आहे.

आजकाल जोडीदाराच्या निवडीपासून ते लग्नापर्यंत तरुणाईची मते बदललेली दिसत आहेत. ऑफरमुळे अविवाहीत मुलं या देशातील मुलींसोबत लग्न करण्यास तयार होतील. तसंच या देशातील पुरुषांची संख्या महिलांच्या तुलनेत कमी आहे. म्हणूनच सरकारने हे पाऊल उचलले आहे.

पण या वृत्ताचे खंडन करणाऱ्या एका साईटने सांगितले की, "या देशातील पुरुषांची संख्या कमी नाही. आईसलँड एक समृद्ध देश असून यात 1007 पुरुषांमागे 1000 महिला आहेत."