Heart Attack On Camera: लग्नाच्या वरातीत नाचताना तरुणाला हृदयविकाराचा झटका; जागेवर मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
Representative Image (Photo Credits: RawPixel)

विवाहात (Wedding Ceremony) नाचताना एका तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने (Cardiac Arrest) मृत्यू झाला आहे. तो अवघ्या 19 वर्षांचा होता. मुळचा महाराष्ट्रातील असलेला हा तरुण नातेवाईकाच्या लग्नासाठी तेलंगणातील निर्मल जिल्ह्यातील पारडी गावात गेला होता. या गावात त्याच्या नातेवाईकाच्या लग्नाचे रिसेप्शन होते. रिसेप्शनमध्ये नाचत असताना अचानक हा तरुण खाली कोसळला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, डॉक्टरांनी त्याल मृत घोषीत केले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लेटेस्ट मराठी या व्हिडिओची पुष्टी करत नाही.

व्हिडिओत पाहायला मिळते की, संगिताच्या तालावर एक तरुण ठेका धरुन नाचत आहे. मात्र, नाचता नाचता तो उभ्यानेच जमीनीवर कोसळतो. उपस्थित पाहुण्यांनी नजीकच असलेल्या भैन्सा एरिया हॉस्पिटलमध्ये त्याला तत्काळ नेले. मात्र, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. डॉक्टरांनी सांगितले की तरुणाला मोठ्या प्रमाणात हृदयविकाराचा आल्याने त्याचा मृत्यू झाला असावा.  (हेही वाचा, Bride Dies of Heart Attack: धक्कादायक! लग्नाच्या विधीदरम्यान वधूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; कुटुंबियांनी तिच्या जागी धाकट्या बहिणीसोबत लावलं लग्न)

व्हिडिओ

धक्कादायक म्हणजे, दोन दिवसांत तेलंगणात घडलेली ही दुसरी घटना आहे. या आधी तेलंगणामध्ये 23 फेब्रुवारी रोजी हैदराबादमधील जिममध्ये व्यायाम करताना 24 वर्षीय पोलीस कॉन्स्टेबलचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. 24 वर्षीय विशाल वायबी हा कसरत केल्यानंतर अचानक खाली कोसळला तो क्षण जिमच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. विशाल हा बोवनपल्लीचा रहिवासी होता आणि त्याच्या पश्चात त्याची बहीण आणि वृद्ध आई-वडील आहेत.