Death | Representative Photo (Photo Credit: PTI)

Bride Dies of Heart Attack: गुजरात (Gujarat) मधील एका मुलीच्या लग्नाचा दिवस तिच्या आयुष्यातील शेवटचा दिवस असल्याचं समोर आलं आहे. गुजरातमधील भावनगरमधील एका नववधूचा सुभाषनगर परिसरात लग्नाच्या विधीदरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) मृत्यू झाला. भावनगर येथील भगवानेश्वर महादेव मंदिरासमोर ही दुर्दैवी घटना घडली. हेतल असं नवऱ्या मुलीचं नाव होतं.

लग्नाचे विधी सुरू असताना हेतलला हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर सर्व विधी थांबवण्यात आले. प्राप्त माहितीनुसार, लग्नाचे विधी पार पाडत असताना, हेतलला चक्कर आली आणि ती बेशुद्ध पडली. तिला जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेल्यावर हृदयविकाराच्या झटक्याने तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. (हेही वाचा - Heart Attack On Camera: नवरदेवाला हळदी लावताच 40 वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल)

हेतलच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. नातेवाईकांनी लग्नाचा सोहळा सुरू ठेवण्यासाठी पर्यायी योजना सुचवली. त्यांनी वधूच्या धाकट्या बहिणीला तिची जागा घेऊन विशालशी लग्न करण्याचा सल्ला दिला.

वधूच्या मृत्यूनंतर, कुटुंबाने तिच्या बहिणीचे वराशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि तिच्या लहान बहिणीसोबत लग्नाचे विधी चालू ठेवले. समारंभ संपेपर्यंत हेतलचा मृतदेह कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवण्यात आला होता.

भावनगर शहराचे नगरसेवक व मालधारी समाजाचे नेते लक्ष्मणभाई राठोड यांनी ही घटना अत्यंत दुःखद असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, या घटनेमुळे वधूच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला. मात्र, वधू आणि वराच्या कुटुंबियांनी यातून समाजापुढे आदर्श घालवून देत वधूच्या धारट्या बहिणीचा विवाह लावून दिला. हे खरचं कौतुकास्पद आहे.