एका धक्कादायक घटनेत एका 40 वर्षीय व्यक्तीचा हळदी सोहळ्यात सहभागी होत असताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, ही धक्कादायक घटना हैदराबादच्या काला पत्थरमध्ये घडली आहे. मोहम्मद रब्बानी असे मृताचे नाव आहे. नातेवाइकांच्या घरी हळदी समारंभामध्ये त्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला. या वेदनादायक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, तो माणूस वराकडे तोंड करून बसला आहे आणि तो त्याला हळद लावत आहे आणि तेवढ्यात तो खाली पडताना दिसतो. घाईघाईत कुटुंबीयांनी त्याला जवळच्या रुग्णालयात नेतात, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
पहा व्हिडिओ
ये किस तरह की मौत है? इतना खुशनुमा माहौल, शादी का फंक्शन। फिर अचानक मातम। ऐसा लग रहा एक सेकंड पहले तक मरने वाले को भी कोई अंदाजा नहीं हुआ।
ट्रेंड सा चल रहा है। pic.twitter.com/Xg5vRaXxsT
— Ashish Urmaliya (@TheJournalistIN) February 23, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)