Scorpio Accident Video | (Photo Credit - Twitter)

उत्तराखंड (Haridwar ) राज्यातील हरीद्वार (Haridwar) येथून एक धक्कादायक बातमी आहे. बहादराबाद (Bahadarabad) यथे रस्त्याने निघालेल्या लग्नाच्या वरातीत चक्क एक भरधाव कार (SUV) येऊन घुसली. त्यामुळे झालेल्या अपघात 1 जण जागीच ठार झाला तर उर्वरीत 31 जण जखमी झाले आहेत. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. घटनेचा व्हिडिो सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) झाला आहे. लेटेस्टली मराठी व्हिडिओची पुष्टी करत नाही. ठार झालेला व्यक्ती बँड पथकातील असल्याचे समजते.

वरातीतील वऱ्हाडी मंडळींना धडक दिल्यावर SUV चालक घटनास्थळावरुन पोबारा करण्याच्य बेतात होता. मात्र, वरातीतील नागरिकांनी त्याला पकडले आणि पोलिसांनाही घटनेची माहिती दिली. पोलिसांचे पथक तातडीने अपघातस्थळी पोहोचले. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. (हेही वाचा, Viral Video: पुण्यात शाळकरी मुलांना सहलीला नेताना बसचे ब्रेक झाले फेल; चालकाने प्रसंगावधान राखत चालत्या गाडीतून उडी मारून 'असे' वाचवले मुलांचे प्राण (Watch Video))

एसयूव्हीच्या चालकाला (आरोपी) ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आणि क्लिप ऑनलाइन आली. पोलिसांनी माहिती देताना सांगितले की, बहादराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धानोरी रोडवर असलेल्या सरदार फार्म हाऊसवर बेलडा गावातून लग्नाची मिरवणूक निघाली होती. तेव्हा बहादराबाद बाजूकडून भरधाव वेगात आलेल्या चारचाकी वाहनाने वरातीतील लोकांना धडक दिली. ही गाडी धानोरीला जात होती. वरातीमधील लोक नाचगाण्यात दंग होते. त्यामुळे त्यांना धडक बसेपर्यंत कोणतीच कल्पना आली नाही.

ट्विट

पोलिसांनी पुढे सांगितले की, अपघातात, बँड सदस्यांपैकी एकाचा मृत्यू झाला आणि इतर 31 जण गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर, संतप्त झालेल्या लग्नातील पाहुण्यांनी वाहन चालकाला मारहाण केली. आरोपी वाहन चालकाला अटक करण्यात आली आहे, आणि वाहन देखील जप्त करण्यात आले आहे. पुढील तपास सुरू आहे.