BUS | Twitter

पुण्यामध्ये (Pune) बारामतीच्या (Baramati) मोरगाव (Morgaon) मधील खाजगी क्लासची विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस मोठ्या अनर्थापासून वाचली आहे. या बसचा ब्रेक अचानक फेक झाला होता. पण बस चालकाने घटनेचं प्रसंगावधान राखत मोठा अनर्थ टाळला. चालत्या बसमधून उडी मारून त्याने बस रोखली. या घटनेचा सारा थरार एका सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्ये कैद झाला आहे. सध्या तो व्हिडीओ सोशल मीडीयामध्ये वायरल होत आहे.

वरंधघाट मार्गावरून रायगड किल्ल्यावर विद्यार्थ्यांना सहलीसाठी घेऊन जात असताना पुण्याच्या भोर येथील चौपाटी परिसरामध्ये हा काळजात धस्स करणारा प्रकार घडला. बारामतीच्या मोरगाव मध्ये खाजगी क्लासच्या विद्यार्थ्यांना घेऊन बस सहलीला निघाली. त्या बसमध्ये 34 विद्यार्थी होते. चालकाला जेव्हा लक्षात आलं की आपल्या बसचे ब्रेक फेल झाले आहेत तेव्हा त्यांने रस्त्यावरील नागरिकांना दूर करून चालत्या बसमधून सावधपणे उडी मारली. यावेळी त्याने लगेजच चालाखाली दगड लावला आणि बस नियंत्रणामध्ये आणली. यामुळे मोठा अनर्थ टळला.

पहा व्हिडीओ

दरम्यान या बस चालकाच्या प्रसंगावधानामुळे विद्यार्थ्यांचे प्राण वाचले आहेत. पण सध्या पुण्यात वाढतं दुर्घटनांचं प्रमाण चिंतेचा विषय झाला आहे. काही दिवसांपूर्वी भोर परिसरात एका बसने पेट घेतला होता. त्यावेळीदेखील चालकाने प्रसंगावधान राखत प्रवाशांचे प्राण वाचवले होते.