Image For Representation (Photo Credits: Pixabay)

विवाह सोहळ्यामध्ये नवदांपत्याला संसार उपयोगी अनेक भेटवस्तू दिल्या जतात. तर, काहीजण त्यांच्या आवडी-निवडीनुसार वस्तूची खरेदी करून त्यांना देतात. मात्र, एका विवाहसोहळ्यात नवरदेवाला मिळालेले गिफ्ट पाहून पाहुणे मंडळी सुद्धा हैराण झाले आहेत. या विवाहसोहळ्यात नवरदेवाला चक्क एके-47 रायफल (AK-47) गिफ्ट म्हणून देण्यात आली आहे. नवरदेवाला मिळालेले हे गिफ्ट इतर कोणी नव्हेतर चक्क त्याच्याच सासूने दिले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाकिस्तानातील एका विवाहसोहळ्यातील असल्याचे सांगितले जात आहे.

सोशल मिडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये एक महिला नवरदेवाला गिफ्ट म्हणून एके-47 रायफल देताना दिसत आहे. संबंधित महिला ही नवरदेवाची सासू असल्याचे समजत आहे. विशेष म्हणजे, हे  पाहून नवरदेव धास्तावला नसून सासूने दिलेले हे गिफ्ट त्याने हसत स्वीकारले आहे. हा व्हिडिओ पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या सईद इख्तियार नावाच्या व्यक्तीने ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना सईदने उर्दु भाषेत, ‘अशी सासू असावी’ अशा आशयाचे कॅप्शन दिले आहे. हे देखील वाचा- Jennifer Lopez Nude Video: इंटरनॅशनल स्टार जेनिफर लोपेझ आपल्या नवीन गाण्याच्या व्हिडिओमध्ये झाली न्यूड; Watch Sexy Video

पाहा व्हिडिओ-

दरम्यान, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर युजर्सच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. तसेच अनेकांनी याचा निषेध केला आहे. तर, काहीजणांनी यावर मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. मात्र, हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे? तसेच कोणत्या ठिकाणाचा आहे? याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही.