Greater Noida Lift Viral Video: लिफ्टमध्ये अडकला लहान मुलगा, पाहा पुढे काय घडले,  व्हिडिओ व्हायरल
Greater Noida Lift Viral Video | PC - Twitter/ @scrible_anjali)

उंचच उंच इमारतींमध्ये लिफ्ट (Elevator) वापरणे हे काही नवीन नाही. तसेच, लिफ्टमुळे होणारे अपघातही ( Elevator Accident) नवे राहिले नाहीत. देशभरात अनेक ठिकाणी लिफ्ट अपघातांच्या घटना वारंवार पुढे येतात. त्याच्या चर्चा होतात पुढे काहीच होत नाही. आताही असाच एक व्हिडिओ व्हायरल (Greater Noida Lift Viral Video) झाला आहे. ज्यात लिफ्ट अचानक बंद पडल्यामुळे एक किशोरवयीन मुलगा लिफ्टमध्येच अडकून पडला आहे. ग्रेटर नोएडा येथील निराला एस्पायर सोसायटीत घडलेला हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सांगितले जात आहे की, लिफ्टमधून जात असताना दुसऱ्या मजल्यावर लिफ्टचा दरवाचा अचानक उघडला आणि लिफ्ट बंद पडली. त्यामुळे हा मुलगा लिफ्टमध्येच अडकला.

लिफ्टमध्ये अडकलेला मुलगा जवळपास 10 मिनीटे लिफ्टमध्ये अटकला होता. हा मुलगा लिफ्टमध्ये सायकल घेऊन चडला होता आणि तो एकटाच होता. त्यामुळे लिफ्ट मध्येच बंद पडल्यानंतर तो चांगलाच घाबरला. व्हायरल व्हिडिओची लेटेस्टली मराठी पुष्टी करत नाही. व्हिडिओत पाहायला मिळते की, मुलगा लिफ्टमध्ये अडकल्याने प्रचंड घाबरला आहे. तो अत्यावस्थ झाला आहे. अस्वस्थ झालेला हा मुलगा बचावासाठी ओरडत आहे. लिफ्टमध्ये असलेली बटने दाबत आहे. परंतू, काहीच होत अनसल्याने अखेर तो चिडतो आणि लिफ्टच्या भिंतींवर हाताने जोरदार मारु लागतो. परंतू, लिफ्टचा दरवाजा उघडतच नसल्याने तो रडू लागतो. (हेही वाचा, Lift Accident: भावासोबत लपाछपी खेळताना मुंबईतील तरुणीचा लिफ्ट अपघात, जागीच मृत्यू)

व्हिडिओ

दरम्यान, बाहेरच्या बाजूला बहुदा लिफ्ट वापरण्यासाठी इतरही लोक जमले असावेत. सोसायटीमधील लिफ्टच्या बाहेरील लोक लिफ्टसाठी थांबलेले असतात. लिफ्ट येत नाही परंतू, लिफ्टमधून कोणत्यातरी लहान मुलाचा आवाज येत असल्याचे पाहून लिफ्ट अडकल्याचे समजते. त्यानंतर सोसायटीतील रहिवाशांनी सुरक्षारक्षकाला बोलावले आणि लिफ्टमधील मुलाला बाहेर काढण्यात आले. असेही सांगितले जात आहे की, नेमका याच वेळी सुरक्षा रक्षक जागेवर नव्हता. नागरिकांनी फोन करुन त्याला बोलावून घेतले आणि मग मुलाची सुटका झाली.