एखादी चांगली नोकरी (Funny Jobs) मिळवायची असेल तर त्यासाठी चांगले शिक्षण, चांगले व्यक्तीमत्व आणि त्यासोबतच आवश्यक ज्ञान असणेही तितकेच चांगले. कंटाळा आणि आळस हे कोणत्याही चांगल्या नोकरीचे शत्रूच. त्यामुळे आळशी आणि कंटाळवाण्या व्यक्तीला नोकरी देणे कोणीही टाळेल हे आपण जाणताच. पण, एखाद्या नोकरीसाठी आळस आणि कंटाळा हाच जर पात्रतेचा विषय असेल तर? होय, आळशी आणि कंटाळा असलेल्या लोकांना (Lazy People) नोकरी, अशी जाहिरातच (Job Advertisement) केली आहे. अशाच प्रकारची एक नोकरी आहे. ज्यासाठी पात्रता आळस आणि कंटाळा, दु:ख हीच आहे. आपणही या नोकरीसाठी अर्ज करु शकता. पण तत्पूर्वी आपल्याला त्याबातब काही गोष्टी जाणून घ्याव्या लागतील.
विशेष असे की, सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहिराती देऊन लोक या नोकरीबद्दल एकमेकांना सांगत आहेत. काही पत्रकेही शररातील विविध भींतींवर लावण्यात आली आहेत. कोणीतरी या जाहीरातीचा फोटो काढला आणि सोशल मीडियावर शेअर केला. झाले. लोक वाऱ्याच्या वेगाने या जाहीरातीचे फोटो शेअर करु लागले आहेत. सोशल मीडिया, इन्स्टाग्राम, फेसबुक असा विविध प्लॅटफॉर्मवर या जाहीरातीचे फोटो शेअर होत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेली ही जाहीरात नेमकी कुठली आहे याबाबत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. परंतू, जाहीरात मात्र व्हायरल झाली आहे. हा कोणीतरी प्रँक केला असावा अशीही शंका काहीनी उपस्थित केली आहे. (हेही वाचा, Crafted Beds: झोपा, TV पाहा आणि कमवा 25 लाख रुपये; आरामदाई नोकरी, घ्या जाणून)
व्हायरल झालेल्या जाहिरातीमध्ये कोणत्या प्रकारच्या कर्मचाऱ्याची गरज आहे याबाबत सांगण्यात आले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पत्रकात बोल्ड अक्षरांमध्ये सांगण्यात आले आहे की, त्यांना कशा प्रकारच्या कर्मचाऱ्याची आवश्यकता आहे. स्टाफची गरज आहे असा जाहिरातीचा मथळा आहे. त्याखाली त्यांना कशा प्रकारचा उमेदवार हवा आहे याबाबत माहिती आहे.
ट्विट
— No Context Brits (@NoContextBrits) June 28, 2022
जाहिरातीमध्ये म्हटले आहे की, उमेदवार हा आळशी आणि दु:खी असावा. फक्त तो आगोदरच्या कर्मचाऱ्यांसोबत मिळून मिसळून राहायला पाहिजे. उमेदवारांनी स्वत: अर्ज घेऊन दाखल व्हावे. फक्त येण्यापूर्वी त्याने अंघोळ करुन यावे.