गर्लफ्रेंडसोबत टिक-टॉक व्हिडिओ बनवणे पडले महागात, मग वाचा पुढे काय घडले?
Tik Tok (Photo Credits-Gettey Images)

सध्या तरुणांमध्ये टिक-टॉक अॅपचे वेड अधिक प्रमाणात वाढले आहे. देशभरात टिक-टॉक अॅप हा काही महिन्यातच लोकप्रिय झाला आहे. टिक-टॉकवर व्हिडिओ तयार करुन अनेकजण प्रसिद्ध झाले आहेत. परंतु हैदरबाद येथील एका तरुणाला टिक-टॉकवर व्हिडिओ तयार करुन शेअर करणे, चांगलेच महागात पडले आहे. या तरुणाने प्रियसीसोबत एक व्हिडिओ काढून सोशल मिडियावर शेअर केला. त्यामुळे कुटुंबासह स्वत: प्रियसीनेही त्याला मारहाण केली. ही घटना हैदराबाद येथे घडली.

टाईम्स नाऊने दिलेल्या वृत्तानुसार, मारहाण करण्यात आलेल्या तरुणाचे नाव बुगप्पा असे आहे. बुगप्पा यादगीर जिल्ह्यातील हालिगेरा गावचा रहिवासी आहे. एका दिवशी बुगप्पाने आपल्या त्याच्या प्रियसीसोबत एक व्हिडिओ काढून सोशल मि़डियावर शेअर केला. त्यानंतर तो इतका व्हायरल झाला की, थेट प्रियसीच्या कुटुंबापर्यंत जाऊन पोहचला. ज्यामुळे त्यांच्या रिलेशनशीपबाबत तिच्या घरीही माहिती पडले. यामुळे प्रियसीच्या कुंटुंबाने त्याला बेदम मारहाण केली. बुगप्पा याला करण्यात आलेल्या मारहाणीचा व्हिडिओ काढण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर, सोशल मिडियावरही शेअर करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हे देखील वाचा-धक्कादायक! हिंदू मंदिरामधील 'पवित्र पाण्याने' नवऱ्याने धुतला बायकोचा प्रायव्हेट पार्ट; पोलिसांच्या कारवाईच्या भीतीने मागितली माफी (Video)

धक्कादायक म्हणजे, बुगप्पा हा व्हिडिओ काढल्यानंतर सोशल मिडियावर शेअर करतोय, याची प्रियसीला माहिती नसल्याचे ती सांगत आहे. त्यामुळे प्रेयसीनेदेखील प्रियकराला चप्पलने मारहाण केली. प्रियकराने हा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केल्यामुळे ती संतापली होती.