Ghost Captured in Camera: घरात स्वयंपाकगृहातून येऊ लागले विचित्र आवाज, हे सर्व अनुभवणा-या व्यक्तीने काढलेले फोटोज आले समोर, See Pics
Ghost Captured in Camera (Photo Credits: Reddit)

तुमच्यापैकी किती जणांचा भूतांवर (Ghost) विश्वास आहे माहित नाही. अनेकांचा भूतांवर विश्वास आहे तर अनेकांना भूत हा केवळ भीतीचा आणि अंधश्रद्धेचा भाग आहे असे वाटते. मात्र काहींनी या गोष्टींचा अनुभव घेतल्याने त्यांचा या गोष्टींवर विश्वास बसतो. असाचा काहीसा प्रकार घडला एका व्यक्तीच्या बाबतीत... Reddit यूजर ने भूताचे फोटोज कॅप्चर केले आहेत. हे ऐकून तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही किंवा हा सर्व मस्करीचा भाग असे वाटेल. पण असे घडले आहे. OppySpoopyMan नावाच्या एका Reddit यूजरने आपल्या घराच्या स्वयंपाकगृहातून विचित्र आवाज ऐकले. त्यावेळी तो घरात एकटाच होता. ते आवाज ऐकून तो इतका घाबरला की तो आपले कपडे बांधून घराबाहेर पडत होता. मात्र त्यावेळी अचानक त्याला किचनमध्ये जे काही दिसले ते पाहून त्याच्या डोळ्यावर विश्वास बसला नाही.

स्वयंपाकघरातून आवाज आल्यानंतर तो व्यक्ती घाबरून कपडे घराबाहेर पडत होता. अशावेळी अचानक त्याला किचनच्या दरवाज्याजवळ काहीतरी एक विचित्र हालचाली दिसली. त्यावेळी त्याने ताबडतोब त्याचा फोटो काढला. हा फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.हेदेखील वाचा- केरळ: मच्छिमा-यांच्या जाळ्यात अडकलेला महाकाय देवमासा पुन्हा सोडला समुद्रात, नेटक-यांकडून होतोय कौतुकाचा वर्षाव

After hearing taps and noises from my kitchen I take a photo and see this. from r/Ghosts

पहिल्यांदा तुम्हाला त्या फोटोत काही दिसणार नाही. मात्र जेव्हा तुम्ही तो फोटो झूम कराल तेव्हा तुम्हाला दरवाज्याच्या चारही बाजूला झुकलेला एक चेहरा दिसेल. जो अगदी सरळसरळ दिसत आहे. सुरुवातीला Reddit च्या यूजर्सने या फोटोला खोटे असल्याचे सांगितले. मात्र जेव्हा त्यांनी तो फोटो झूम केला तेव्हा त्यांना एक सावली दिसली.

ही संपूर्ण घटना ऐकतानाच अंगावर काटा येतो. मात्र त्या यूजरने ही गोष्ट अनुभवली आहे. आता यावर किती विश्वास ठेवायचा आणि किती नाही हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे.