चारही बाजूंनी छान निळ्याशार समुद्राने वेढलेल्या केरळमध्ये (Kerla) नुकतीच एक आश्चर्यचकित करणारी घटना घडली. केरळच्या समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या मच्छिमा-यांच्या जाळ्यात एक महाकाय असा देवमासा (Whale) अडकला. मात्र या मासेमा-यांनी त्या देवमाशाला अगदी व्यवस्थितरित्या पुन्हा समुद्रात सोडले. या देवमाशाला समुद्रात सोडतानाचा व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल (Viral Video) झाला होता. हा व्हिडिओ पाहून आणि यातील मच्छिमा-यांनी या देवमाशाला समुद्रात सोडण्यासाठी केलेली मेहनत पाहून या सर्वांचे नेटक-यांकडून कौतुक केले जात आहे.
झाले असे की, हे मच्छिमार माणसे समुद्रात मासे पकडण्यासाठी गेले होते. त्यावेळी अचानक त्यांच्या जाळ्यात हा विशाल देवमासा अडकला. त्यानंतर सर्व मच्छिमारांनी मिळून त्यांना पुन्हा समुद्रात सोडण्याचा निर्णय घेतला. ही घटना शुक्रवारी तिरुवनंतपुरमच्या शंगुमुगम समुद्रात घडली.
हेदेखील वाचा- Tamil Nadu: देव तारी त्याला कोण मारी! अंगावरून ट्रक जाऊनही वृद्ध महिला सुखरूप; पहा अंगावर काटा आणणारा प्रसंग (Watch Video)
या भागात चक्रीवादळाचा इशारा दिल्याने या मासेमा-यांनी समुद्रात न जाता किना-यावरुनच मासे पकडत होते. अशा वेळी अचानक हा देवमासा त्यांच्या जाळ्यात अडकला. त्यानंतर सर्वांनी या जाळ्याभोवती उभी राहून जाळे घट्ट पकडून देवमाशाला यातून बाहेर काढले आणि त्याला समुद्रात सोडले. समुद्रात सोडल्यांतर हा माशा प्रचंड अॅक्टिव झाला.
ही घटना शंगुमुगमचे मूळ रहिवासी अजितने कॅमे-यात कैद केली आणि हा व्हिडिओ सोशल मिडियावर पोस्ट केला. त्यानंतर काही वेळातच हा व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाला. NDTV ने बोलताना अजितने सांगितले की, "हा देवमासा पाण्यात सोडण्यासाठी जवळपास 60 मच्छिमार होते. सुरुवातीला त्यांना वाटले मासा पोहण्यासाठी पूर्णपणे सक्षम नसेल. मात्र दोनदा प्रयत्न करुन देवमाशाने समुद्रात आपला रस्ता बनवला. जेव्हा मी तिकडे पोहोचलो तेव्हा शार्क मासा पोहू लागला होता. हा आम्हा सर्वांसाठी खास अविस्मरणीय क्षण होता."
तसं पाहायला गेले तर, देवमासा कधीही समुद्रकिना-यावर सापडत नाही. मात्र सध्याची पाण्याची परिस्थितीा पाहता असे झाले असावे असेही त्यांनी सांगितले. तेथील स्थानिक वन विभागानेसुद्धा मासेमा-यांच्या या कामाचे कौतुक केले आहे.