Tamil Nadu: देव तारी त्याला कोण मारी! अंगावरून ट्रक जाऊनही वृद्ध महिला सुखरूप; पहा अंगावर काटा आणणारा प्रसंग (Watch Video)
Road accident in Tamil Nadu | (Photo Credits: Twitter/@CGTN/Screengrab)

देव तारी त्याला कोण मारी! या म्हणीची प्रचीती येणाऱ्या घटना आपण सर्वांनीच कधी ना कधी ऐकल्या असतील किंवा पाहिल्या असतील. आताही तामिळनाडूमधून (Tamil Nadu) अशीच एक आश्चर्यचकित करणारी घटना समोर येत आहे. ट्रकने धडक मारून तो अंगावरून जाऊनही एक वृद्ध महिला जिवंत राहिली आहे. मुख्य म्हणजे ती पूर्णतः सुखरूप आहे. अंगावर काटा आणणारी ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, Tiruchengode येथे एक प्रकारचा चमत्कार घडून, वृद्ध महिलेच्या अंगावरून ट्रक जाऊन ती त्यातून व्यवस्थित बाहेर पडली आहे.

सीजीटीएनने ट्विटरवर शेअर केलेल्या 54 सेकंदाच्या क्लिपमध्ये दिसत आहे की, एका वयस्कर महिला हातात प्लास्टिकचे पॅकेट घेऊन रस्त्याच्या मध्यभागी उभी आहे. तिला रस्ता क्रॉस करायचा आहे मात्र क्षणार्धात तिच्या डाव्या बाजूने एक पिवळा पिक-अप ट्रक येतो व उजवीकडे वळण घेताना ट्रकची महिलेला टक्कर बसते आणि ट्रक महिलेच्या अंगावरून जातो. या वेळी आपण सर्वजणच पुढे काय होईल म्हणून शास रोखून व्हिडिओकडे पाहत राहतो व पुढच्या क्षणीच महिला अगदी सुखरूपपणे ट्रकच्या खालून बाहेर पडताना दिसते. (हेही वाचा: काय सांगता? Vistara च्या विमानावर मधमाशांचा हल्ला; अग्निशमन दलाने पाण्याचा फवारा मारून हटवले (Watch Video)

सीजीटीएनने दिलेल्या माहितीनुसार, उजवीकडे वळण घेताना या ड्रायव्हरला महिला न दिसल्याने हा अपघात घडला. वृत्तानुसार शनिवारी कोझीकोड-पलक्कड राष्ट्रीय महामार्गावर Thodukappu जवळ ही घटना घडली. सध्या सोशल मिडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

दरम्यान, याआधी नोव्हेंबर 2018 मध्ये मथुरा येथे एक वर्षांच्या मुलाच्या अंगावरून ट्रेन गेली होती. त्यावेळीही हा मुलगा पूर्णपणे सुखरूपपणे या अपघातामधून वाचला होता.