Bee Attack (Photo Credit Twitter)

सामान्यतः मधमाशा (Honey Bee) किंवा त्यांचे पोळे हे झाडांवर किंवा इमारतींच्या कोपऱ्यावर आढळले. मात्र, कोलकाता विमानतळावर (The Kolkata’s International Airport) उपस्थित लोकांना मधमाशांच्या एका विचित्र घटनेचा सामना करावा लागला. कोलकाता येथील नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर विस्तारा (Vistara) एअरलाइन्सच्या विमानास मधमाशांनी घेरले होते. विमानाच्या खिडकीवर बसलेल्या मधमाशांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. कर्मचाऱ्यांनी बराच प्रयत्न करूनही त्यांना या मधमाशांना तिथून हलवण्यास यश आले नाही. त्यानंतर मात्र अग्निशमन विभागाने विमानावर पाण्याचा फवारा केला व तेव्हा कुठे या माशांनी ते विमान सोडले.

शनिवारी, 28 नोव्हेंबरला विस्ताराचे Airbus A320neo हे विमान भुवनेश्वरहून कोलकाता येथे दाखल झाले. विमानाच्या ट्रॅकरनुसार रात्री विमान विमानतळावर होते. रविवारी संध्याकाळी पाच वाजता विस्ताराचे विमान दिल्लीकडे उड्डाण करणार होते. विमान तयार करण्यासाठी विमान कंपनीचे कर्मचारी वे क्र. 25 वर पोहोचले, तेव्हा त्यांनी पाहिले की मधमाशांनी विंडोशील्डच्या बाहेर आपला तळ ठोकला आहे. या मधमाशांना हटवण्यासाठी खूप प्रयत्न केले गेले. या दरम्यान दिल्लीकडे जाणारे विमान सुमारे दीड तास उशिराने उडाले.

घडलेल्या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. अनेकांनी त्यावर चित्रविचित्र कमेंट्स केल्या आहेत. विमानतळ प्राधिकरणाच्या म्हणण्यानुसार, ही घडलेली घटना काही पहिली नाही. सध्याच्या वातावरणात असे बर्‍याचदा घडते. महत्वाचे म्हणजे फक्त अर्ध्या तासात मधमाशा विमानावर ठाण मांडून बसतात. कोलकाता एयरपोर्टवर 16 तासाच्या अंतराने एकच वे वर उभा असलेल्या विस्तारा एअरलाइन्सच्या दोन विमानांवर मधमाशांनी हल्ला केला होता. यामुळे दोन्ही विमानांना तासाभराचा उशीर झाला. (हेही वाचा: Viral Video: लग्नानंतर सासूने जावयाला दिलेले गिफ्ट बघून पाहुणे मंडळी सुद्धा झाले हैराण; पाहा संपूर्ण व्हिडिओ)

दोन्ही प्रसंगी मधमाशांना हटवण्यासाठी अग्निशमन दलाला पाण्याचे बोर्स तैनात करावे लागले. कोलकाता विमानतळाचे संचालक कौशिक भट्टाचार्य म्हणाले की, या दोन घटनांनंतर विमानतळाचे मैदान आणि टर्मिनल इमारतीच्या बाहेरील भागाची तपासणी केली गेली आहे. यामध्ये खात्री केली गेली आहे की, मधमाशांनी कोठे पोळे केले नाही ना. त्यानंतर कीटकनाशकांचीही फवारणी केली गेली.