Ganesh Chaturthi 2021: आगरा येथे पीएम मोदी यांच्या खांद्यावर बसलेल्या गणरायाच्या मुर्तीची जोरदार चर्चा
गणेशोत्सव (Photo Credits-News18Hindi)

Ganesh Chaturthi 2021:  देशभरात साजरा केल्या जाणाऱ्या गणेशोत्सवानिमित्त सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. याच पार्श्वभुमीवर आगरा येथे पीएम मोदी यांच्या खांद्यावर बसलेल्या गणरायाच्या मुर्तीची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. या व्यतिरिक्त भगवान शंकर गणेश जी कोरोनाची लस देताना सुद्धा दिसून आले आहे. पीएम मोदी यांच्या खांद्यावर विराजमान झालेला बाप्पा पाहता लोकांच्या तो पसंदीस पडला आहे. तर आगरा मधील मधु नगर क्षेत्रात राहणाऱ्या लोकेश रावत यांना जागृकतेचे संदेश देणाऱ्या गणपती बाप्पाची मुर्ती तयार करणे आवडते.

पीएम मोदी यांच्या कार्याने प्रभावित होत लोकेश यांनी ही मुर्ती घडवली आहे. ही मुर्ती लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनला आहे. याच प्रकारे आणखी एक मुर्ती अशी आहे त्यात गणपती हॉकी खेळत आहे. ऑलिंम्पिंक मध्ये 41 वर्षानंतर मेडल मिळाल्याने लोकेश यांनी गणपती हॉकी खेळत असल्याची मुर्ती तयार केली.(Lalbaugcha Raja 2021 Online Darshan: 'लालबागचा राजा' ची प्राणप्रतिष्ठा पूजा सुरू; इथे पहा यंदाचा बाप्पाचा लूक)

गणेशोत्सव (Photo Credits-News18Hindi)

दरम्यान, माती पासून बनवलेल्या मुर्त्या या पर्यावरण पूरक असतात. बहुतांश जण या मुर्त्या घरच्या घरी विसर्जन करत त्याचे पाणी झाडांना देतात. कोरोनापासून बचाव करण्यापासून ते पर्यावरणाच्या सुरक्षिततेचा संदेश देणाऱ्या मुर्त्या लोकेश यांनी तयार केल्या आहेत.