कोरोनाच्या संकटकाळात विद्यार्थ्यांना सरकारकडून फ्री मध्ये स्मार्टफोन मिळणार असल्याचा दावा करणारी एक पोस्ट सध्या सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे. परंतु ही पोस्ट खोटी असून त्यात असे म्हटले आहे की, कोरोना व्हायरसमुळे शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आल्याने सरकारकडून फुकटात अॅन्ड्रॉइड स्मार्टफोन दिले जाणार आहेत. दाव्यानुसार, विद्यार्थ्यांना स्मार्टफोन देऊन सरकार मदत करु पाहत असल्याचे ही म्हटले आहे. त्याचसोबत हा मेसेज सर्वांना शेअर करा असे सुद्धा म्हटले आहे. त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता येईल.
दाव्यात असे म्हटले आहे की, कोरोना व्हायरसमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम झाला आहे. याच कारणास्तव सरकार विद्यार्थ्यांना मोफत स्मार्टफोन देणार आहे. पण या खोट्या दाव्याबद्दल PIB ने खुलासा केला आहे. त्यांनी फॅक्ट चेक मध्ये असे म्हटले आहे की, पोस्ट मधील करण्यात आलेला दावा खोटा असून केंद्र सरकारने विद्यार्थ्यांना मोफत स्मार्टफोन देणार असल्याची घोषणा केलेली नाही. त्यामुळे हा दावा खोटा आहे.(Fact Check: कोविडवरील लस 'COVISHIELD' 73 दिवसात होणार उपलब्ध? सीरम इंन्स्टीट्युट ऑफ इंडिया यांनी दिले 'हे' स्पष्टीकरण)
दावा: कोरोना वायरस के कारण स्कूल और कॉलेज बंद होने के कारण छात्रों की शिक्षा प्रभावित हुई है, इसलिए सरकार सभी छात्रों को मुफ्त एंड्रॉइड स्मार्टफोन दे रही है #PIBfactcheck: यह दावा फर्जी है, केंद्र सरकार ने ऐसी कोई घोषणा नहीं की है. pic.twitter.com/LkFA2rMtSn
— PIB Fact Check (@PIBFactCheck) August 24, 2020
COVID-19 च्या दरम्यान, सरकाने लोकांना व्हॉट्सअॅप, फेसबुक, ट्विटर सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील कोणत्याही चुकीच्या माहितीला बळी पडू नका असे आवाहन केले आहे. या महिन्याच्या सुरुवातीलाच अशाच पद्धतीचे दावे करण्यात आले होते. त्यात शाळा सुरु होणार असल्याचे सांगण्यात आले होते.
व्हायरल पोस्टमध्ये असा दावा केला होता की, सरकार येत्या 1 सप्टेंबर ते 14 नोव्हेंबर पर्यंत नियमांनुसार शाळा आणि महाविद्यालये सुरु करणार आहे. तर एका वृत्तपत्राच्या हेडलाईन मध्ये असे म्हटले होते की, 1 सप्टेंबर पासून देशातील शाळा आणि महाविद्यालये सुरु होणार आहेत. PIB फॅक्ट चेक यांनी ही बातमी खोटी असल्याचे स्पष्ट करत सरकारने असा कोणताच निर्णय न घेतल्याचे ही म्हटले होते.