नवजात बाळासोबत गिटार वाजवणाऱ्या वडिलांचा व्हिडिओ व्हायरल; पाहुन तुम्हीही म्हणाल So Cute
Father Playing Guitar With Newborn Baby (Photo Credits: Twitter)

काही कारणास्तव त्रस्त असला किंवा कंटाळलेले असाल तर सोशल मीडियावर व्हायरल (Viral) होणारा हा सुपरक्युट व्हिडिओ (Supercute Video) नक्की पहा. हा व्हिडिओ नक्कीच तुमच्या चेहऱ्यावर हास्य आणेल. दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या सुपरक्युट व्हिडिओमध्ये एक व्यक्ती आपल्या नवजात बाळासोबत (Newborn Baby) गिटार वाजवत आहे. हा व्हिडिओ एका सायमन BRFC हॉपकिंस (Simon BRFC Hopkins) नावाच्या युजरने ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना त्याने कॅप्शन दिले की, "वडील आपल्या नवजात बाळासोबत, किती सुंदर!" हा व्हिडिओ आतापर्यंत तब्बल 5.3 हजारहून अधिक लोकांनी पाहिला असून वेगाने व्हायरल होत आहे. तुम्हालाही हा व्हिडिओ पाहुन आनंद होईल आणि पुन्हा पुन्हा पाहावासा वाटेल, यात शंका नाही.

या व्हिडिओत तुम्ही पाहु शकाल, एक व्यक्ती गिटार वाजत आहे. त्या गिटारवर त्याचं नवजात बाळ झोपलं आहे आणि ते ही संगीताचा आनंद घेत आहे. बाळाने निळ्या रंगाचे कपडे आणि टोपी घातली आहे. विशेष म्हणजे हे बाळ देखील आपली इवलुशी बोटं गिटारच्या तारांवर फिरवत आहे. गिटारवर बाळाचे शांतपणे झोपणे, तारांवरुन बोटे फिरवणे याचे युजर्संना प्रचंड कौतुक वाटत आहे. (Youngest Person To Do Water Skiing: काय सांगता? 6 महिन्यांच्या बाळाने केले वॉटर स्कीइंग; बनवला विश्वविक्रम, Watch Video)

पहा सुपरक्युट व्हिडिओ:

36 सेकंदाच्या या व्हिडिओने युजर्सचे मन जिंकले आहे. व्हिडिओवर लाईक्स, कमेंट्सचा पाऊस पडत आहे. सो क्यूट, सुंदर, मनमोहक अशा मस्त प्रतिक्रीया युजर्स यावर देत आहेत. "खूप सुंदर! माझे मन जिंकले! हे पाहून प्रसन्न वाटले," अशी प्रतिक्रीया एका युजरने दिली आहे. तर दुसऱ्या युजरने लिहिले, "सुंदर, अतिशय सुंदर." दरम्यान, सोशल मीडिया माध्यमांमुळे आपल्याला असे नवेनवे आणि अनोखे व्हिडिओज पाहायला मिळतात.