Youngest Person To Go Water Skiing (Photo Credit : Instagram)

6 महिन्यांचे बाळ, ज्याला आपण व्यवस्थित कडेवरही घेऊ शकत नाही, अशा मुलाने इतक्या कमी वयात वर्ल्ड रेकॉर्ड (World Record) बनविला आहे. होय, सर्वांनाच आश्चर्यचकित करणारी ही बातमी आहे. अमेरिकेच्या उटाह राज्यात (Utah State) सहा महिन्यांच्या मुलाने वॉटर स्कीइंगचा (Water Skiing) जागतिक विक्रम मोडला आहे. या मुलाचे नाव जगातील सर्वात युवा वॉटर स्कीइंग व्यक्ती म्हणून नोंदवले गेले आहे. सध्या या बाळाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. रिच हम्फ्रीज (Rich Humphreys) असे या बाळाचे नाव असून, त्याचे पालक कॅसी आणि मिंडी हम्फ्रीज (Casey and Mindi Humpherys) यांनी हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.

न्यूज वेबसाइट यूपीआयच्या वृत्तानुसार, या बाळाच्या नावाने पालकांनी इन्स्टाग्राम अकाउंट तयार केले आहे. हा व्हिडिओ तिथेच शेअर केला गेला आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, या बाळाने बोटीशी जोडलेल्या लोखंडी रॉडला घट्ट पकडले आहे. दुसरीकडे, त्याचे वडील दुसर्‍या बोटीवर आहे व ते मुलासोबत पुढे जात आहेत. या बाळाने लाइफ जॅकेटही घातले आहे. या बाळाला कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होऊ नये म्हणून, पूर्ण काळजी घेऊन त्याला पाण्यात सोडण्यात आले होते. हा व्हिडिओ पोस्ट करताना लिहिले आहे की, ‘मी माझ्या 6 महिन्यांच्या वाढदिवसा दिवशी वॉटर स्कीइंग केले. माझ्यासाठी ही मोठी गोष्ट होती... # वर्ल्डरेकॉर्ड’. (हेही वाचा: ताबा सुटल्याने चिमुकला वॉकरसह रस्त्यावर, बाईक वरुन उडी मारुन तरुणाने वाचवला अपघात, पहा हा व्हिडिओ)

पहा व्हिडिओ -

 

View this post on Instagram

 

I went water skiing for my 6 month birthday. Apparently that’s a big deal… #worldrecord

A post shared by Rich Casey Humpherys (@richcaseyhumpherys) on

हा व्हिडिओ 13 सप्टेंबर रोजी शेअर करण्यात आला होता, जिथे त्याला कोट्यवधी व्ह्यूज आणि कमेंट्स मिळाल्या आहेत. हा व्हिडिओ ट्विटरवरही शेअर करण्यात आला आहे, जिथे आतापर्यंत 7.6 दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत. दरम्यान, या व्हिडिओवर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काहींनी या मुलाचे कौतुक केले आहे, तर काहींनी या बाळाच्या सुरक्षेविषयी चिंता व्यक्त केली आहे. एबीसी न्यूजच्या मते, मागील अनौपचारिक जागतिक विक्रम ऑबर्न एब्शरने स्थापित केला होता. जेव्हा त्याने त्याच्या पालकांसह वॉटर स्कीइंग केले तेव्हा तो सहा महिने, दहा दिवसांचा होता.