भूक लागल्यावर झटपट तयार होणार्या पदार्थांपैकी एक म्हणजे 'मॅगी न्यूडल्स'. अनेक भारतीयांच्या तो आवडीचा पदार्थ आहे. दरम्यान व्यक्ती तितक्या प्रकृती म्हटलं जात आणि त्यानुसार प्रत्येकाची मॅगी बनवण्याची आणि चाखण्याची पद्धतही वेगवेगळी आहे. मॅगीचे अनेक प्रकार सोशल मीडीयामधून समोर आले आहेत पण सध्या सोशल मीडियात पाण्याऐवजी फॅन्टा मध्ये उकळलेली एक मॅगी तुफान चर्चेमध्ये आहे. गाझियाबाद मध्ये एक स्टॉल विक्रेता मागील 4-6 महिन्यांपासून ही फॅन्टा मॅगी बनवत असल्याचं समोर आलं आहे. युट्युबवर त्याचा एक व्हिडिओ असून 13 हजारापेक्षा अधिक व्ह्यूज या व्हिडिओला मिळाले आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)