Amazon Giving Away Free Gifts on IWD 2022 (Photo Credits: Internet)

जागतिक महिला दिवस (International Women’s Day) 2022 आता काही दिवसांतच येणार आहे. अनेक कंपन्यांकडून हा दिवस तुमच्या आयुष्यातील महिलांसाठी स्पेशल करण्याकरिता विविध ऑफर्स जाहीर केल्या आहेत. वेबसाईट वर तुम्ही त्या पाहू शकता. पण सोशल मीडीयाच्या इतर प्लॅटफॉर्मद्वारा मात्र तुमची फसवणूक होऊ शकते. सध्या व्हॉट्सअ‍ॅप मेसेज वर काही फेक लिंक्स पाठवणूक आर्थिक फसवणूकीचे अनेक प्रकार समोर आले आहे. अशांपैकी एक अमेझॉनच्या नावाने देखील महिला दिन विशेष सांगत फ्री गिफ्ट्स साठी गिव्हिंग अव्हे असल्याचं सांगितलं जात आहे. व्हॉट्सअ‍ॅप वर वायरल होत असलेला मेसेज असा दिसत आहे. -https://tinyurl2.ru/m848925299/404.html

अमेझॉनच्या नावाने फ्री गिफ्ट्सची लिंक जर तुम्ही ओपन केली तर तुम्हांला ती केवळ मोबाईल वरून ओपन केली जाईल कम्प्युटर वरून त्याचा अ‍ॅक्सेस नसेल. लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्ही एका वेबसाईट वर रिडिरेक्ट व्हाल. त्यामध्ये “Welcome to Amazon International Women’s Day 2022 Giveaway! Complete the short quiz and win an exclusive gift from Amazon. We have only 41 gifts left.” असा मेसेज दिसेल.

वेबसाईट वरून चार प्रश्न विचारले जातात. क्विझ पूर्ण झाल्यानंतर तुमची उत्तरं तपासली जात आहेत. तुम्ही चारही प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. तुमचा आयपी व्हॅलिड आहे असे मेसेज येतात.

दरम्यान ही लिंक फेक आहे. कारण अशाप्रकारे फ्री गिव्ह अवे अमेझॉन कडून जाहीर करण्यात आलेले नाही. त्यांची वेबसाईट किंवा सोशल मीडीया प्लॅटफॉर्मवे देखील तसा पर्याय नाही. त्यामुळे अशा फेक लिंक्सवर क्लिक करणं टाळा. तसेच अनोळखी व्यक्तींना टेक्स्ट, इमेलच्या स्वरूपात तुमची खाजगी माहिती देणं देखील टाळा.