Google CEO पदासाठी लिंक्डइनवर पोस्टींग; ड्रीम जॉब मिळविण्यासाठी हजारो युजर्सनी केले अप्लाय
Fake job posting on LinkedIn | | (Photo Credit: Archived, edited, representative images)

इंटरनेट विश्वातील सर्वात मोठे सर्च इंजिन अशी ओळख अलेल्या जगपरसिद्ध अशा Google कंपनीच्या CEO पदावर नोकरी करणे कोणाला नाही आवडणार? जगभरातील अनेक युजर्सना लिंक्डइन (LinkedIn) या संकेतस्थळामुळे ही संधी मिळाली. त्याचे झाले असे Google CEO पदासाठी जॉब पोस्टींग दाखवणारी जाहीरात लिंक्डइनवर जगभरातील युजर्सनी पाहिली. अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. पण, जगभरातील युजर्सनी या पोस्टसाठी अप्लाय केलेच. काही लोकांना वाटले की विद्यमान Google CEO सुंदर पिचाई हे या पदाचा राजीनामा देणार आहेत.

जगभरातून युजर्स Google CEO पदासाठी अप्लया करतच होते. दरम्यान, काही वेळाने लिंक्डइनने अधिकृतरित्या सांगितले की, हा एक सिक्योरिटी बग आहे. ज्यामुळे कोणताही यूजरस कोणत्याही कंपनीच्या बिजनेस पेजच्या माध्यमातून अस्सल वाटावी अशी जॉब ओपनिंग पोस्ट करु शकतो. अमेरिकन वेबसाईट मॅशबेलने दिलेल्या वृत्तानुसार, ही अनौपचारिक लिस्टिंग्जसुद्धा कंपनाच्या जॉब्स पेजवर दिसते. तसेच, दिसतानाहा ही अस्सल जॉब ओपनिंग्स प्रामाणेच दिसते. गूगल सीईओची जॉब पोस्टिंग मिशेल रिजैंडर्स नावाच्या एका व्यक्तीकडून करण्यात आली होती. ज्यावर लिंक्डइन युजर्सच्या मिळतीजुळती प्रतिक्रिया आल्या.

एका युजरने म्हटले की, त्याने Google CEO पदासाठी अप्लाय केले आहे. सुंदर पिचाई चांगले काम करत आहे. तसेच, कंपनीचे उत्पन्नही चांगले आहे. तरीसुद्धा Google CEO पदासाठी ओपनिंग असल्याचे पाहून मला आश्चर्य वाटले. (हेही वाचा, Indian Navy Recruitment 2019: 10 वी पास तरुणांसाठी भारतीय नौसेनेत नोकरीची संधी! पहा कसा, कुठे कराल अर्ज?)

दरम्यान, या प्रकारानंतर लिंक्डइन ने म्हटले की, आमचे लक्ष या प्रकाराकडे वेधल्याबद्दल मिशेल रिजेंडर्स यांचे आभार. आम्ही पोस्टींग हटवली आहे. तसेच, अशा प्रकारची पोस्ट पुन्हा लाईव्ह होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. लिंक्डइन खऱ्या लोकांसाठी आहे. जिथे ते आपल्या करिअरशी संबंधीत माहिती इतर लोकांसोबत शेअर करु शकतात.