सध्या ट्वीटर वर एक फेक ट्वीट वायरल होत आहे. ज्यामध्ये करण्यात आलेल्या दाव्यानुसार, Candy Crush Saga हा ऑनलाईन गेम चे 3 तासात 3 मिलियन डाऊनलोड्स झाले आहेत. भारताचा माजी क्रिकेट टीम कॅप्टन एमएस धोनी (MS Dhoni) हा गेम खेळताना दिसल्यानंतर कॅन्डी क्रशच्या डाऊनलोड्समध्ये वाढ झाल्याचं म्हटलं आहे. सध्या सोशल मीडीयामध्ये धोनीचा एक व्हिडीओ वायरल होत आहे ज्यामध्ये एअर हॉस्टेस धोनीला काही चॉकलेट्स देताना दिसत आहे. यामध्ये धोनी कॅन्डी क्रश खेळत असल्याचं चाहत्यांनी नोटिस केलं आहे. दरम्यान धोनीला अनेक चॉकलेट्स ऑफर झाली होती पण त्याने केवळ 'Omani dates' स्वीकारत बाकीच्या गोष्टी परत केल्या.
पहा धोनीचा व्हिडीओ
MS Dhoni - the crowd favourite. pic.twitter.com/ltpud9P9Jj
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 25, 2023
दरम्यान महेंद्र सिंह धोनीचा हाच व्हिडीओ सोशल मीडीयामध्ये वायरल झाल्यानंतर "Candy Crush Saga Official" या ट्वीटर अकाऊंट वरून धोनीच्या व्हिडिओ नंतर 3.6 मिलियन नवीन युजर्स हा गेम खेळताना आढळले आहेत. अनेकजण या ट्वीट्वर फसले आहेत. दरम्यान अशाप्रकारचे काहीच घडलेले नाही. या ट्वीट मधील दावा खोटा आहे.
फेक ट्वीट
Just In - We Got 3.6 Million New Downloads in just 3 hours.
Thanks to the Indian Cricket Legend @msdhoni . We are Trending In India Just Because Of You.
~ Team Candy Crush Saga pic.twitter.com/LkpY8smxzA
— Candy Crush Saga Official (@teams_dream) June 25, 2023
@teams_dream कडून ट्वीट करण्यात आले आहे. ज्याचा Candy Crush अधिकृत सोबत कोणताच संबंध नाही. Candy Crush Saga कडून याची कोणतीही माहिती दिली नसल्याचं LatestLY ने तपासलं आहे. मात्र धोनीला कॅन्डी क्रश खेळताना पाहून त्याचा तो व्हीडिओ सोशल मीडीयात वायरल झाला आहे. पण यामुळे मोठ्या प्रमाणात नवे युजर्स वाढल्याची माहिती नाही.