Fact Check: उत्तर प्रदेशच्या स्पेशल टास्क फाॅर्स ने आपल्या कर्मचाऱ्यांना दिले मोबाईलमधून काही अॅप्स काढून टाकण्याचे आदेश? PIB ने सांगितले व्हायरल मेसेज मागील सत्य
fake Message of STF Claim (Photo Credits-PIB Twitter)

कोविड-19 च्या संकटात अनेक फेक न्यूज (Fake News), खोटे मेसेजेस सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर लडाख येथील गलवान खोऱ्यात भारत-चीनी सैनिकांमध्ये झालेल्या झटापटीत भारताच्या 20 जवानांना आपले प्राण गमवावे लागले. याचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटत असून चीनी वस्तू, प्रॉडक्स ते अगदी अॅपवर देखील बहिष्कार घालण्याची मागणी जोर धरु लागली आहे. देशात उद्भवलेल्या या संपातजनक परिस्थितीही अनेक फेक मेसेजेस सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यात उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) स्पेशल टास्क फोर्स द्वारे (Special Task Force) काही ठराविक अॅप्सच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे, असे म्हटले आहे. या मेसेजमध्ये अॅप्सची नावे देखील दिली आहेत. तसंच आपल्या कर्मचाऱ्यांना मोबाईलमधून हे अॅप्स त्वरीत हटवण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असेही मेसेजमध्ये म्हटले आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मेसेजची पडताळणी PIB कडून करण्यात आली असून हा मेसेज फेक असल्याचे समोर आले आहे. हा मेसेज फेक असून अशी कोणत्याही प्रकारची कोणतीही अॅडव्हायजरी जारी करण्यात आली नसल्याचे पीआयबीने ट्विटच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे. (Fact Check: प्रधानमंत्री धन लक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना 0% व्याजदरावर 5 लाखांचे कर्ज मिळणार? PIB ने केला या मेसेजचा खुलासा)

मेसेजमधील दावा:

उत्तर प्रदेशच्या एसटीएफने काही अॅप्सचा वापर करु नका असे सांगण्यात आले आहे. यात अॅप्सची नावे देखील देण्यात आली आहेत. यात झुम, टिक टॉक, युसी ब्राऊजर, शेअर चॅट यांसारख्या अॅपचा समावेश आहे.

पीआयबी फॅक्ट चेक:

हा मेसेज फेक आहे. एसटीएफकडून अशा कोणत्याही प्रकारची अॅडव्हायजरी जारी करण्यात आलेली नाही.

PIB Fact Check Tweet:

कोरोना व्हायरस संकटापासूनच चीन विरुद्ध देशातील वातावरण काहीसे गरम झाले होते. त्यात आता गलवान खोऱ्यातील झटापटीची भर पडली. त्यामुळे चीनी प्रॉडक्ट्सवर बंदी घालण्यासाठी किंवा त्याचा वापर टाळण्यासाठी अनेकजण पाठींबा दर्शवत आहेत. याच मानसिकतेचा फायदा घेत खोटे मेसेजेस सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत. दरम्यान अशा कोणत्याही मेसेजवर डोळे झाकून विश्वास ठेवण्यापूर्वी त्यामागील सत्य जाणून घेणे आवश्यक आहे.