Fake Post on Lockdown (Photo Credits: Twitter, @PIBFactCheck)

कोरोना व्हायरस संकट काळात (Coronavirus Pandemic) अनेक फेक आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाल्याचे समोर आले आहे. अलिकडेच देशात पुन्हा लॉकडाऊन होणार असल्याची बातमी चांगलीच व्हायरल होत आहे. केंद्र सरकार (Central Government) 25 सप्टेंबर पासून पुन्हा एकदा देशव्यापी लॉकडाऊन (Nationwide Lockdown) घोषित करणार असल्याचा दावा या व्हायरल मेसेजमध्ये करण्यात आला आहे. तसंच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (National Disaster Management Authority) जारी केलेल्या आदेशानुसार देशात पुन्हा लॉकडाऊन होणार असल्याचा दावा यात करण्यात आल्याचे म्हटले आहे. कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी पुन्हा एकदा देशव्यापी लॉकडाऊनचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून यावेळेस पूर्वीपेक्षा कडक लॉकडाऊन असेल, असे या मेसेजमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, या व्हायरल मेसेजची सत्यता पीआयबी फॅक्ट चेककडून तपासण्यात आली आहे. हा संदेश खोटा असून अशा प्रकारची कोणतीही ऑर्डर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून जारी करण्यात आली नसल्याचे पीआयबीने ट्विटच्या माध्यमातून सांगितले आहे. (भारत-चीन तणावादरम्यान 80,000 भारतीय जवानांनी केला सुट्टीसाठी अर्ज? PIB ने सांगितले व्हायरल ट्विट मागील सत्य)

व्हायरल मेसेज मधील दावा: राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने जारी केलेल्या आदेशानुसार 25 सप्टेंबर पासून पुन्हा एकदा देशव्यापी लॉकडाऊन घोषित करण्यात येणार आहे.

पीआयबी फॅक्ट चेक: हा मेसेज खोटा असून NDMA कडून अशा प्रकारचा कोणताही आदेश देण्यात आलेला नाही.

Fact Check By PIB:

कोविड-19 संकटात व्हायरल होणारे फेक मेसेजेस नागरिकांच्या चिंतेत भर टाकतात. दिशाभूल करतात. त्यामुळे मेसेजची पडताळणी केल्याशिवाय मेसेज फॉरवर्ड करु नका किंवा त्यावर विश्वासही ठेऊ नका असे आवाहन वारंवार सरकार, आरोग्य यंत्रणांकडून करण्यात येते. तसंच पीआयबीकडूनही फेक मेसेजेसचा उलघडा केला जातो.