माळशेज घाटाचं रौद्ररूप च्या नावाने सोशल मीडियात व्हायरल होतोय जम्मू - श्रीनगर हायवे वरील दरडीचा व्हिडिओ
Land Slide Viral Video (Photo Credits: Twitter)

मुंबईसह महाराष्ट्रामध्ये मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. यामुळे पुणे, नाशिक, कोकण भागात दरड कोसळून दुर्घटनांचं प्रमाणही वाढत आहे. अनेक जण यादरम्यान घाटातून प्रवास करताना दरड कोसळल्याचे, डोंगरातून कोसळणार्‍या धबधब्याचे फोटो, व्हिडिओ शेअर करत आहेत. मात्र सध्या ट्विटर आणि व्हॉट्सअ‍ॅप सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर माळशेज घाटाच्या दरडीचं रौद्ररूप च्या नावाने जम्मू काश्मिर मधील एक व्हिडिओ शेअर केला जात आहे. दरड कोसळत असलेली सुमारे 14 सेकंदाची एक क्लिप सध्या झपाट्याने व्हायरल होत आहे. या क्लिपसोबत माळशेज घाटातील रस्त्ता वाहतुकीसाठी बंद अशाप्रकारचे मेसेजही पसरवले जात आहेत. मात्र यामध्ये काहीच तथ्य नसल्याचे आता समोर आले आहे. मुंबईकर पडले निळ्याशार आभाळाच्या प्रेमात! निसर्गाच्या अद्भुत नजार्‍याचे फोटो सोशल मीडियात व्हायरल

सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत असलेला व्हिडिओ

हा व्हिडिओ माळशेज घाटातला असल्याचं सांगितलं जात असले तरीही तो मूळचा जम्मू काश्मिर येथील आहे. मूळात हा व्हिडिओ जम्मू - श्रीनगर हायवे वरील रामबान येथील आहे. यामुळे जम्मूमधील वाहतूक बंद असल्याचं म्हटलं आहे. पुण्यात माळशेज घाटात पावसाळ्याच्या दिवसात नयनरम्य दृश्य असतं. या भागात अनेक रिसॉर्ट्स आहेत. प्रामुख्याने फ्लेमिंगो पक्षी पाहण्यासाठी येथे गर्दी केली जाते. पावसाळ्यात या भागात हमखास पर्यटकांची मोठी गर्दी असते. Maharashtra Monsoon Updates: विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज; मुंबई, पुणे शहरात आज पावसाचा जोर ओसरणार: स्कायमेटचा अंदाज

   खरं वास्तव काय? 

मुंबई, ठाणे सह पुण्यातही पावसाचा जोर थांबला आहे. मुंबई - पुणे दरम्यान रखडलेली रेल्वे सेवा देखील आता हळूळू पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवण्याआधी माहिती तपासून पहा. तसेच तुमच्याकडील व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप वरही अशाप्रकारचा कोणता व्हिडिओ क्लिप आणि मेसेज आला असेल तर त्याची खातरजमा केल्याशिवाय फॉरवर्ड करणं टाळा.