मुंबईकर पडले निळ्याशार आभाळाच्या प्रेमात! निसर्गाच्या अद्भुत नजार्‍याचे फोटो सोशल मीडियात व्हायरल
Mumbai Skies Are Unusually Blue Today (Photo Credits: @rahul_seo/ @tanuj_garg/ @falgunshah420/ Twitter)

मुंबईमध्ये सध्या ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे. महाराष्ट्रात पुढील आठवड्याभरात श्रावणाचं आगमन होणार आहे. दिवसा ऊन आणि रात्री काही जोरदार सरींचा पाऊस असं सध्या वातावरण सध्या मुंबईकर अनुभवतं आहेत. नेहमी घडाळ्याच्या काट्यावर धावणार्‍या मुंबईकरांना निळ्याशार आभाळाचं मोहक दर्शन झालं आहे. मुंबईमध्ये वातावरण नेहमी सारखं ढगाळ नसल्याने निळशार आकाश अनुभवण्याची संधी आज अनेकांनी लुटली. काही उत्साही लोकांनी सोशल मीडियावरही निसर्गाच्या अद्भुत दृश्यांचा नजारा आपल्या कॅमेर्‍यामध्ये कैद करत शेअर केला आहे. त्यामुळे ट्राफिकच्या लांबच लांब रांगांमध्ये अडकून पडलेल्या मुंबईकरांना आज चिडचिड करत बसण्यापेक्षा आकाशाचं दुर्मिळ रूप पाहण्याची संधी मिळाली होती. Monsoon 2019 Updates: मुंबईकरांनो! पुढील काही दिवस दमदार पावसासाठी सज्ज रहा : स्कायमेटचा अंदाज

मागील काही रेंगाळणारा पाऊस आता आठवड्याभरात पुन्हा दमदार हजेरी लावणार असल्याचं चित्र आहे. दरम्यान आज मुंबईमध्ये जुलै महिन्यात नागरिकांनी अनेक वातावरणातील बदल पाहिले आहेत. कधी धुव्वाधार कोसळणारा पाऊस, कधी 36+ अंशावर असलेले तापमान तर कधी वीजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाटही अनुभवला आहे.

काय म्हणतोय वेधशाळेचा अंदाज?

काम, ऑफिस, नेहमीची दगदग यामधून आता थोडा वेळ काढा आणि अद्याप तुम्ही निळंशार आभाळ पाहिलं नसेल तर आता पहा आणि तुम्ही पाहिलेला एखादा खास नजाराणा आमच्यासोबत शेअर करा नक्की!