Fact Check: महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली यासारख्या विविध ठिकाणी मुसळधार पावासामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच या ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली असून त्याचा फटका स्थानिक नागरिकांसह प्राण्यांना सुद्धा बसला आहे. या परिस्थित सोशल मीडियात एक व्हिडिओ व्हायरल होत असून त्यामध्ये एका धरणातील पाणी सोडल्याने अत्यंत जोरात पुढे ढकलले जात असल्याचे दिसुन येत आहे. तसेच हा व्हिडिओ पावना धरणाचा असल्याचे बोलले जात आहे.
मात्र सोशल मीडियात व्हायरल झालेला हा पावना धरणाचा व्हिडिओ खोटा असून तो चीन मधील Yellow River Dam चा असल्याचे सत्य समोर आले आहे. त्यामुळे नागरिकांनी व्हायरल झालेल्या व्हिडिओवर चिंता व्यक्त केली आहे. परंतु पावना धरणाची स्थिती अशा पद्धतीची झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे.
पुण्यातील पवना धरण सांगून व्हायरल झालेला व्हिडिओ:
Opened floodgates of one of the four reservoirs in Pune, India. pic.twitter.com/MrYeSNddzu
— Swaminathan P (@swami2005) August 5, 2019
सत्य व्हिडिओ:
त्यामुळे जर तुम्ही चीन मधील Yellow River Dam हे इंटरनेटवर सर्च केल्यास तुम्हाला पुण्यातील पवनाधरणाचा हा व्हिडिओ असल्याचे सांगितल्याचे खोटे असल्याचे कळून येईल. तर चीनमधील हेनान प्रांतामधील जियाउआन मधील शियाओलंगडी धरणाचा हा व्हिडिओ असल्याचे सांगण्यात येत आहे. सोशल मीडियात पुण्यातील पवना धरणाचा व्हिडिओ सांगितल्याने त्यामधील काही चित्र हे चीनच्या धरणाचे असल्याचे सहज समजून येते.