Facebook (Photo Credit: Pixabay)

आजची तरूण पिढी सोशल मीडिया आणि इंटरनेटच्या आहारी गेल्याचं सांगत अनेकजण त्यावरून घरातील वडीलधारी मंडळींचा ओरडा खात असतील. पण दिल्लीमध्ये सोशल मीडीयामुळे एका आई-मुलाची 15 वर्षांनंतर पुन्हा झाली आहे. महिलेची स्मृती गेल्याने ती परिवारापासून दूरावली होती. मात्र सोशल मीडीयामुळे 15 वर्षांनी पुन्हा आपल्या मुलाकडे परतली आहे. भावूक करणारी ही घटना 2005 सालची आहे. राम देवी या महिला वकील होत्या. पतीसोबत भांडण झाल्याने त्यांनी कोलकत्ता मधील घर सोडलं होतं. त्यावेळी मुलगा मित्रजीत चौधरी अवघा 7 वर्षांचा होता.

आपलं घर सोडल्यानंतर राम देवी दिल्ली आल्या. भारताच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांनी प्रॅक्टिस सुरू केली. पण त्यांना स्मृतिभ्रंशाचा मानसिक आजार जडला होता. त्यांच्यावर दिल्लीत सुरूवातीला Institute of Human Behaviour आणि नंतर Allied Sciences मध्ये नऊ महिने उपचार झाले. पुढे त्यांना HOPE या रिहॅब सेंटरमध्ये ठेवण्यात आले. कालांतराने त्यांना अचानक आपल्या मुलाचं नाव आठवलं. Facebook नंतर आता Instagram वर सुद्धा Messenger Rooms च्या माध्यमातून एकाच वेळी 50 जणांसोबत व्हिडिओ कॉलवर बोलता येणार.

राम देवींना आपल्या कुटुंबासोबत पुन्हा राहता यावं यासाठी त्या राहत असलेल्या केंद्राकडून मित्रजीत चौधरी नामक प्रत्येक व्यक्तीचा शोध सुरू झाला. त्यांनी मित्रजीत चौधरी नावाच्या 6-7 जणांचा शोध घेतला. त्यापैकी केवळ एकानेच प्रतिसाद दिला. दरम्यान राम देवी फेसबूकवरील फोटोंद्वारा त्यांच्या मुलाला ओळखू शकली नसली तरीही व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून त्यांनी लगेजच मित्रजीतला ओळखलं. नंतर त्याला दिल्लीला बोलावण्यात आले. या हद्यस्पर्शी माय-लेकराच्या भेटीनंतर त्यांनी आपल्या परिवारात पुन्हा जाण्याचा निर्णय घेतला.