
देशभरात कोरोना व्हायरसरने थैमान घातले असून नागरिक घरातून बाहेर पडताना सुद्धा विचार करत आहेत. तसेच नागरिकांना अनावश्यक ठिकाणी किंवा गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे. याच पार्श्वभुमीवर एक व्यक्ती बायकोसोबत खोट बोलून प्रेयसी सोबत फिरायला गेला. पण या खोटारड्या नवऱ्याला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नवऱ्याने बायकोला ब्रिटेन येथे मी एका बिझनेस ट्रीपसाठी जात असल्याचे कारण देऊन प्रेयसीला भेटण्यासाठी गेल्याचे सांगण्यात येत आहे.
रिपोर्टनुसार, सदर व्यक्ती हा 30 वर्षाचा असून त्याचे नाव गुप्त ठेवण्यात आले आहे. कोरोनामुळे व्यक्तीला वेगळे ठेवण्यात आले आहे. परंतु नवऱ्याला कोरोना कसा झाला याबाबत खरे कारण बायकोला माहिती नाही आहे. पण नवऱ्याने बिझनेसच ट्रीपचे कारण देत तिला फसवून प्रेयसीसोबत फिरण्याचा प्लॅन केला होता. मात्र हा प्लॅन नवऱ्याला अधिकच महागात पडला आहे. द सन यांच्या रिपोर्टनुसार, कोरोना व्हायरसचे लक्षण दिसून आल्यानंतर त्याला इंग्लड मधील एका सार्वजनिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याचवेळी त्याने आपण बायकोला खोट बोलून प्रेयसीसोबत फिरायला गेल्याचे कबुल केले आहे. इटली येथे फिरायला गेल्याच्या कारणामुळे त्याला कोरोनाची लागण झाली आहे.(Coronavirus Impact: कोरोना व्हायरसच्या भीतीने प्राध्यापकाने उत्तर पत्रिका केल्या मायक्रोवेव्हमध्ये गरम; विद्यार्थ्यांची वर्षभराची मेहनत जाळून खाक)
या प्रकरणी व्यक्तीची अधिक चौकशी केली असता त्याने त्याचे एक्स्ट्रा मॅरिटियल अफेअर एका तरुणीसोबत सुरु असल्याचे सांगितले आहे. तर बायकोने स्वत:ला नॉर्थ इंग्लंड येथील घरात सेल्फ आयसोलेशन मध्ये ठेवले आहे. तर बायकोला नवऱ्याचे खोटे कारण कळल्यास काय होईल याचा पत्ता नाही. परंतु सध्या या व्यक्तीची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे.