2021 संपायला अवघे काही तास शिल्लक आहेत, अशात जगभरात नवीन वर्ष 2022 चे स्वागत करण्यासाठी मोठा उत्साह दिसून येत आहे. अनेकदा लोक नवीन वर्षाची सुरुवात पार्टीने करतात आणि काही लोक या पार्टीत दारूचाही समावेश करतात. दारू आरोग्यासाठी हानिकारक आहे हे माहित असूनही अनेक लोक नियमित दारूचे सेवन करतात. नवीन वर्षांमध्ये आपण सण-उत्सव, सुट्ट्या, प्रवास याबाबत अनेक योजना बनवत असतो. तसेच काही लोकांसाठी ‘ड्राय डेज’ (Dry Days in 2022) सुद्धा महत्वाचे असतात. ज्या दिवशी दारूची दुकाने बंद असतात, ज्याला ‘ड्राय डे’ असे म्हणतात.
वर्षभरात 2 ऑक्टोबरसह असे अनेक दिवस येतात जेव्हा दारूची दुकाने बंद असतात. अशा परिस्थितीत काही लोकांना हे जाणून घेणे महत्वाचे ठरू शकते की 2022 मध्ये नक्की ड्राय कधी कधी आहेत. कोणतेही सेलिब्रेशन, प्रसंग, विकेंड असो आणि यामध्ये तुम्हाला दारूला सहभागी करून घ्यायचे असेल तर तुम्हाला 2022 मध्ये ड्राय डे कधी आहे हे माहित असणे आवश्यक आहे. म्हणूनच आज आम्ही ड्राय डेची लिस्ट घेऊन आलो आहोत.
2022 मधील भारतामधील ड्राय डेज-
14 जानेवारी (शनिवार) - मकर संक्रांती
२६ जानेवारी (गुरुवार) - प्रजासत्ताक दिन
30 जानेवारी (सोमवार) - हुतात्मा दिन
16 फेब्रुवारी (बुधवार) - गुरु रविदास जयंती
19 फेब्रुवारी (शनिवार) - छत्रपती शिवाजी महाराज जयंती
26 फेब्रुवारी (शनिवार) - स्वामी दयानंद सरस्वती जयंती
1 मार्च (मंगळवार) - महाशिवरात्री
18 मार्च (शुक्रवार) – होळी
10 एप्रिल (रविवार)- राम नवमी
14 एप्रिल (गुरुवार) - डॉ.आंबेडकर जयंती आणि महावीर जयंती
15 एप्रिल (शुक्रवार) - गुड फ्रायडे
1 मे (रविवार) - महाराष्ट्र दिन
3 मे (मंगळवार) - ईद
10 जुलै (रविवार) – आषाढी एकदशी (महाराष्ट्र)
13 जुलै (बुधवार)- गुरु पौर्णिमा (महाराष्ट्र)
8 ऑगस्ट (सोमवार)- मोहरम
15 ऑगस्ट (सोमवार) - स्वातंत्र्य दिन
18, 19 ऑगस्ट (गुरुवार-शुक्रवार) - जन्माष्टमी
31 ऑगस्ट (बुधवार) - गणेश चतुर्थी
9 सप्टेंबर (शुक्रवार) - गणेश विसर्जन
2 ऑक्टोबर (रविवार) - महात्मा गांधी जयंती
5 ऑक्टोबर (बुधवार) – दसरा
8 ऑक्टोबर (शनिवार)- दारूबंदी साप्ताह (महाराष्ट्र)
9 ऑक्टोबर (रविवार) – ईद-ए-मिलाद
24 ऑक्टोबर (सोमवार) – दिवाळी
4 नोव्हेंबर (शुक्रवार) – कार्तिकी एकादशी
8 नोव्हेंबर (मंगळवार) - गुरु नानक जयंती
24 नोव्हेंबर (गुरुवार)- गुरु तेग बहादूर हुतात्मा दिन (पंजाब, दिल्ली)
दरम्यान, यंदा देशातील अनेक राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. गोवा, पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये निवडणूक होणार आहे. अशा स्थितीत ज्या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत आणि ज्या भागात निवडणुका होणार आहेत, तेथे दारूची दुकाने बंद राहणार आहेत. तसेच ड्राय डे हे राज्य आणि शहरानुसार असतात. त्यामुळे वरील नमूद केले दिवस हे तुमच्याही शहरात लागू असतील असे नाही.