Dombivli Urine Case | (Photo Credit: X)

ठाणे (Thane) जिल्ह्यातील डोंबिवली (Dombivli) शहर परिसरातील निलजे येथील अत्यंत धक्कादायक तितकाच किळसवाणा प्रकार पुढे आला आहे. या घाणेरड्या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्याची लेटेस्टली मराठी पुष्टी करत नाही. हा व्हिडिओ एका फळविक्रेत्याचा आहे. जो फळविक्रीच्या गाड्यावर कथीतपणे प्लॅस्टीकच्या पिशवीमध्ये मूत्रविसर्जन (Dombivli Urine Case) करत आहे. मूत्रविसर्जन केल्यावर पिशवीत साचलेली लघवी तशीच ठेऊन, त्याच हाताने तो फळविक्री करत आहे. तो ज्यूसविक्रीही करत असल्याचे प्राथमिक वृत्त आहे. त्याच्या या भयंकर कृत्याचा भांडाफोड होताच नागरिकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. शिवाय, लोकांमध्ये इतके क्रौर्य आणि विक्रीती निर्माणच कशी होते, असा सवाल संतपाने विचारला जात आहे.

पिशवीत लघवी, त्याच हाताने हाताने ज्यूस, फळेही विकायचा

फळविक्रेत्याच्या कृत्याची चित्रपीत सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी घटनेची नोंद तातडीने घेतली. मानपाडा पोलीस स्टेशन अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या आणि कथीतरित्या प्लॅस्टीकच्या पिशवीत लघवी करणाऱ्या तरुणावर कारवाई करण्यात आली आहे. त्याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. अली खान अशी त्याची प्रथामिक ओळख पटली आहे. तो 21 वर्षांचा आहे. प्रकरणाचा तपास सुरु आहे. चौकशीदरम्यान आणखी तपशील पुढे येईल, असे अधिकाऱ्यांनी म्हटले. (हेही वाचा, Ghaziabad Juice Vendor Arrested: ज्यूसमध्ये लघवी मिसळली, गाझियाबाद येथील विक्रेत्यास अटक)

व्हिडिओ पाहून नागरिक संतप्त

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अली खान याच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 271 (धोकादायक रोगाचा संसर्ग पसरण्याची शक्यता, निष्काळजीपणा), 272 आणि 296 (अश्लीलता) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी कारवाई केली असली तरी नागरिकांमध्ये संताप कायम आहे. उघड्यावर विक्री होणारे पदार्थ आणि अवैधरित्या उभे केलेले सर्व ढेले, हातगाडी आणि व्यवसाय करणाऱ्या लोकांवर प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. या मगणीला प्रतिसाद देत प्रशासन आणि पोलीस विभाग कावाई करणार का, याबाबत नागरिकांमध्ये चर्चा आहे.

डोंबिवली येथील घटनेचा व्हिडिओ

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच गाझीयाबाद येथील एका फळांचा रस विक्रेत्या व्यक्तीबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. सदर व्यक्तीसुद्धा दुकानातील भांड्यामध्येच मूत्रविसर्जन करत असे. तो इतक्यावरच थांबत नसे, तर भाड्यात जमा झालेले मूत्र तो ग्राहकांना देण्यात येणाऱ्या ज्यूसमध्ये कथीतरित्या मिसळत असे. काही नागरिकांनी व्हिडिओ चित्रीत केल्यानंतर सदर प्रकरण उघडकीस आले. त्या विक्रेत्यावरही पोलिसांनी तातडीने कारवाई करत त्याला ताब्यात घेतले. दरम्यान, डोंबिवली येथील आरोपीविरोधात पुढे काय कारवाई होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.