Liquor Mafia Kills Dog In Parel (PC - X/@sakshi_dar2819)

Liquor Mafia Kills Dog In Parel: दक्षिण मुंबईतील परळ (Parel) परिसरातील रहिवासी असलेल्या साक्षी दरेकरला आपल्या पाळीव कुत्र्याचा (Dog) मृत्यू झाल्याचं समजल्यानंतर अश्रू अनावर झाले. साक्षी यांनी पोलिसांकडे आरोपी विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. परळ परिसरातील पालिका शाळेच्या आवारात त्यांचा लाडका पाळलेला कुत्रा राजा याला निर्घृणपणे ठार करण्यात आले. दरेकर यांनी शाळेच्या आवारातून बेकायदेशीरपणे दारूचे उत्पादन आणि विक्री केली जात असल्याचं सांगितलं आहे. त्यांनी या संदर्भात अधिकाऱ्यांकडे अनेक तक्रारीही केल्या होत्या.

दरम्यान, पाळीव कुत्र्याच्या मृत्यूच्या दुःखद घटनेनंतर, दरेकर यांनी भोईवाडा पोलीस ठाण्यात प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल केला. तसेच कुत्र्याच्या मृत्यूला दारू माफिया जबाबदार असल्याचा विश्वास व्यक्त केला. पोलिस तक्रारीनुसार, राजाचे (कुत्रा) पाय बांधलेले होते आणि त्याला काठ्या किंवा जड वस्तूने मारहाण केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. (हेही वाचा -Viral Video: मगरीने जबड्यात धरले पण वृद्धाने तारले, पाहा कुत्र्यासोबत नेमके काय घडले?)

दरेकर यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये उघड केले की तिला दारूच्या रॅकेटशी संबंधित व्यक्तींकडून धमक्या आल्या होत्या. दारू माफियाकडून त्यांना तक्रारी थांबवण्याचा इशारा देण्यात आला होता. तथापि, तिने कधीही कल्पना केली नव्हती की, ते तिच्या प्रिय पाळीव प्राण्याला इजा करतील. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये साक्षीने यामागे एका राजकीय पक्षात काम करणाऱ्या एका व्यक्तीचा सहभाग असल्याचं म्हटलं आहे. (Hungry Man Eats Raw Cat Meat: केरळमध्ये भुकेलेल्या विद्यार्थ्याने खाल्ले मृत मांजरीचे कच्चे मांस, पोलिसांनी 'अशी' केली मदत; काय आहे नेमक प्रकरण? वाचा)

पहा व्हिडिओ - 

एफआयआरमध्ये सध्या गुन्हेगारांची 'अज्ञात' म्हणून नोंद करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुधीर कुडाळकर, PAL (प्युअर ॲनिमल लव्हर्स) ग्रुपचे संस्थापक, यांनी या प्रकरणी सखोल तपासाची गरज व्यक्त केली. साक्षी दरेकर यांनी असा अंदाज लावला की, राजाला तिच्या अनुपस्थितीचा बदला म्हणून लक्ष्य केले गेले असावे. पोलिस या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहेत.