
Hungry Man Eats Raw Cat Meat: भूक माणसाला काहीही करायला लावू शकते याचे ताजे उदाहरण उत्तर केरळ (Kerala) मधील कुट्टीपुरममधून समोर आले आहे. येथे बस स्थानकावर एक विद्यार्थी मांजरीचे कच्चे मांस (Cat Meat) खाताना आढळला. हा विद्यार्थी मूळचा आसाम (Assam) मधील धुबरी जिल्ह्यातील असल्याचे पोलिसांनी सांगितले. गेल्या अनेक दिवसांपासून उपाशी असलेल्या या विद्यार्थ्याने उत्तर केरळमधील कुट्टीपूरममध्ये मांजरीचे कच्चे मांस खाल्ले. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, स्थानिक लोकांनी प्रथम त्याला बसस्थानकाच्या पायऱ्यांवर मृत मांजरीचे कच्चे मांस खाताना पाहिले.
पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, 'माहिती मिळाल्यानंतर आम्ही घटनास्थळी पोहोचलो. चौकशी केली असता, गेल्या पाच दिवसांपासून विद्यार्थ्याने काहीही खाल्ले नसल्याचे सांगितले. त्यानंतर आम्ही त्याच्यासाठी अन्न विकत घेतले. त्याने ते अन्न खाल्ले. मात्र, काही वेळाने तो कोणालाही न सांगता तेथून गायब झाला.' (हेही वाचा -Greater Noida Animal Cruelty Video: अल्पवयीन मुलाने कुत्र्याच्या पिल्लाला उंच इमारतीवरून फेकलं; FIR दाखल, पहा व्हिडिओ)
अधिकाऱ्याने पुढे सांगितलं की, 'आज सकाळी आम्हाला माहिती मिळाली की हा तरुण येथील एका रेल्वे स्टेशनवर सापडला आहे. आम्ही त्या ठिकाणी पोहोचून त्याची विचारपूस केली आणि तो कुठून आला हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्याच्या विधानानुसार, तो ईशान्येकडील राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थी आहे. तो डिसेंबरमध्ये आपल्या कुटुंबाला न सांगता ट्रेनने केरळला आला होता. (वाचा -Viral Video: OMG! बांगड्या विकणाऱ्या 'या' महिलेचं अस्खलित इंग्रजी बोलणं ऐकून तुम्हीही म्हणालं, 'व्वा क्या बात है', पहा व्हिडिओ
त्याने आम्हाला त्याच्या भावाचा मोबाईल नंबर दिला जो चेन्नईत काम करतो. आम्ही त्याच्याशी संपर्क साधला. विद्यार्थ्याने दिलेली माहिती बरोबर आढळली. प्राथमिक वैद्यकीय तपासणीनंतर तरुणाला त्रिशूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तरुणाला कोणतीही शारीरिक किंवा मानसिक समस्या नसल्याचे दिसून येत असून त्याचे कुटुंबीय येथे पोहोचल्यानंतर त्याला त्यांच्या ताब्यात देण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.