
Viral Video: भारत अनेक अशी पर्यटन स्थळे आहेत, जेथे परदेशातून लोक फिरायला येतात. विशेष म्हणजे या पर्यटन स्थळावर विविध व्यवसाय करणारे लोकही त्यांच्याशी इंग्रजीत बोलतात. परदेशी पर्यटकांशी संवाद साधून या व्यवसायिकांचे इंग्रजी इतके चांगले झाले आहे की, एखाद्या सुशिक्षित व्यक्तीलाही इतके चांगले इंग्रजी बोलता येणार नाही. नुकताच बांगड्या विकणाऱ्या एका महिलेचा व्हिडिओ (Video of a Woman Selling Bangles) सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यात ती गोव्यातील वॅगेटोर बीच (Vagator Beach) वर एका परदेशी पर्यटकाशी अस्खलित इंग्रजीत बोलताना दिसत आहे.
व्हिडिओमध्ये बांगड्या विकणारी महिला विदेशी पर्यटकाला समुद्रकिनाऱ्यावरील बदलत्या परिस्थितीबद्दल सांगत आहे. या व्हिडिओमध्ये महिला म्हणतेय की, 'हा बीच खूप छान जागा आहे. पूर्वी फक्त परदेशी लोक या बीचवर भेट देण्यासाठी येत असतं. पण कोविडनंतर भारतीय लोक सुट्ट्यांसाठी या बीचवर सतत येत आहेत. महिलेने सांगितले की, वॅगेटोर बीच काळ्या खडकांसाठी ओळखला जातो. गोव्याच्या गजबजलेल्या समुद्रकिनाऱ्यांपासून दूर शांतता शोधणाऱ्या पर्यटकांमध्ये हा बीच लोकप्रिय आहे. व्हिडिओमध्ये महिला बांगड्या आणि हातात घालायचे ब्रासलेट विकताना दिसत आहे.' (हेही वाचा -Elephant Attack Viral Video: अभयारण्यात रस्त्याच्या कडेला फोटो काढणाऱ्या पर्यटकांवर हत्तीचा हल्ला; धावत केला पाठलाग, जाणून घ्या काय घडले पुढे (Watch))
सुशांत पाटील नावाच्या युजरने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना यूजरने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'आयुष्य कसेही असो, ते चांगले कसे जगायचे हे माहित असले पाहिजे.' (वाचा - Tilefish Viral Video: सरड्याप्रमाणे रंग बदलणाऱ्या माशाचा व्हिडिओ व्हायरल, पहा)
पहा व्हिडिओ -
View this post on Instagram
सध्या सोशल मीडियावर या महिलेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. अनेकांनी या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. तसेच बांगड्या विकणाऱ्या महिलेचे इंग्रजी ऐकून नेटकरी अवाक झाले आहेत. महिलेचे इंग्रजीवरील प्रभुत्व पाहून नेटकरी तिचं कौतुक करत आहेत.