Viral Video: मगरीने जबड्यात धरले पण वृद्धाने तारले, पाहा कुत्र्यासोबत नेमके काय घडले?
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, एक वृद्ध व्यक्ती तलावात उभा असल्याचे दिसत आहे, तलावाच्या पाण्यातून डोके बाहेर काढताच त्याच्या हातात एक मगर दिसत आहे. या मगरीच्या जबड्यात कुत्रा अडकलेला आहे. ही व्यक्ती कुत्र्याला मगरीच्या जबड्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करत आहे.
Viral Video: या जगात असे अनेक प्राणी आहेत जे मृत्यूच्या जवळून सुखरूप परत आले आहेत. अशा प्राण्यांबद्दल अनेकदा असे म्हटले जाते की, त्यांनी मृत्यूला पराभूत केले. अनेकवेळा माणसांसोबतच प्राणीही अशा प्रसंगांना बळी पडतात, पण नशिबाने साथ दिली की, यमराजालाही रिकाम्या हाताने परतावे लागते. सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक कुत्रा (Dog) मगरीच्या (Crocodile) जबड्यात अडकतो. यावेळी एक वृद्ध माणूस त्याच्यासाठी देव बनून येतो आणि त्याचा जीव वाचवतो.
हा व्हिडिओ X वर @cctvidiots नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे, ज्याला आतापर्यंत 4.7 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. यावर लोकांनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, एक वृद्ध व्यक्ती तलावात उभा असल्याचे दिसत आहे, तलावाच्या पाण्यातून डोके बाहेर काढताच त्याच्या हातात एक मगर दिसत आहे. या मगरीच्या जबड्यात कुत्रा अडकलेला आहे. ही व्यक्ती कुत्र्याला मगरीच्या जबड्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान त्याच्या तोंडात एक सिगार दिसत आहे. काही प्रयत्नांनंतर, वृद्ध व्यक्ती कुत्र्याला मगरीच्या तावडीतून सोडवण्यात यशस्वी होतो. (Viral Video: तरुणीचा भरधाव ट्रेनमधून उडी मारताचा स्टंट व्हिडिओ व्हायरल)
पहा व्हिडिओ -
Man saves his puppy from being eaten by an Alligator pic.twitter.com/aGNuMMBrTL
— CCTV IDIOTS (@cctvidiots) February 4, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Feb 09, 2024 05:07 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

