Photo Credit: YouTube

लग्नाचा अर्थ फक्त सात फेरे घेणे नाही तर आयुष्यभरासाठीचा असा क्षण आहे तो म्हातारपणी पाहून ही तो क्षण जागता येतो. हल्ली लग्नाचे क्षण कैद करण्यासाठी लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ काढले जातात.विवाहसोहळ्यांमध्ये वधू-वरांचे व्हिडिओ सोशल मीडियावर बर्‍याचदा व्हायरल होतात.बर्‍याच वेळा असे व्हिडिओ समोर येतात जे अतिशय मजेदार असतात आणि ते पाहून आपण हसून हसून पार वेडे होतो.असाच लग्नाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.जो पाहून तुम्ही ही स्वतःला हसण्याशिवाय रोखू शकणार नाही. (Viral Video: अनिवासी भारतीय जोडप्याने धोती आणि साडीत केलं स्कीइंग; व्हायरल व्हिडिओने इंटरनेटवर लावली आग )

सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत आहे. हा व्हिडिओ सामान्य लग्नाच्या दरम्यानचा आहे,जेव्हा कॅमेरामन स्टेजवर वधू-वरांचे फोटो घेत होता.फोटोशूट दरम्यान फोटोग्राफर वधूच्या जवळ आला आणि तिच्या चेहऱ्याला हात लावून तिला पोज सांगू लागला. हे पाहून शेजारीउभा असलेला नवरदेव फोटोग्राफरवर संतापला.आणि रागाच्या भरात त त्याने फोटोग्राफरच्या कानशीलात लगावली.

हा सगळा प्रकार पाहुन नवरी स्वतःचे हसु रोखू शकली नाही आणि ती पोट धरुन हसु लागली.तिला एवढे हसु आले की ती हसून खाली बसली. व्हिडिओमध्ये वधूला असे हसताना पाहून लोक तिची जोरदार प्रशंसा करीत आहेत. लोकांना हा व्हिडिओ खूप आवडतो. पण या व्हिडीओमागची खरी गोष्ट आज आम्ही तुला सांगणार आहोत. या व्हिडिओमधल्या वधु ने केलेल्या या ट्वीट मुळे याची सत्यता समोर आली आहे.

छत्तीसगडमधील तरुण अभिनेत्री अनिकृती चौहान यांनी दावा केला की ही क्लिप तिच्या चित्रपटाचा एक सीन आहे. व्हिडिओ शेअर केल्याबद्दल मोहन चे अभिनेत्रीने आभार मानले आहेत.

तसेच अभिनेत्रीने ही क्लिप तिच्या इंस्टाग्राम हँडलवरही शेअर केली आणि ही क्लिप ''डार्लिंग प्यार झूठा नहीं'' या चित्रपटातील आहे असे तिने सांगितले आहे.