Viral Video: अनिवासी भारतीय जोडप्याने धोती आणि साडीत केलं स्कीइंग; व्हायरल व्हिडिओने इंटरनेटवर लावली आग
धोती आणि साडीत स्कीइंग करणारे जोडपे (फोटो क्रेडिट्स: इन्स्टाग्राम)

Viral Video: साडीमध्ये स्कीइंग केल्यानंतर एक अनिवासी भारतीय जोडपे रात्रीतून इंटरनेटवर व्हायरल झाले आहे. या जोडप्याचा धोती आणि साडीमध्ये स्कीइंग करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या जोडप्याने पारंपारिक स्कीइंग गिअर वेशभूषा न करता पारंपारिक भारतीय पोशाखात स्कीइंग केलं. दिव्या आणि मधूने अमेरिकेच्या मिनेसोटा येथील लोकप्रिय स्कीइंग स्पॉट वेल्च व्हिलेजमध्ये स्कीइंगला जाण्याचा निर्णय घेतला. व्हिडिओमध्ये दिव्या आणि मधु दोघे धोती आणि साडीमध्ये स्कीइंग गिअर एन्जॉय करताना दिसले. दिव्या तिच्या स्कीइंग गिअरवर निळ्या रंगाची साडी परिधान करताना दिसली. तसेच यावेळी मधुने ग्रीन शर्ट आणि धोती परिधान केली होती. दिव्याने हा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.

या व्हिडिओला कॅप्शन देताना दिव्याने लिहिलं आहे की, 'स्वतःला डिस्ट्रेक्ट करण्यासाठी आपल्याला आज खरोखर काहीतरी वेडेपणा करण्याची गरज आहे.' #sareeadventures #dmadkindalove असे हॅशटॅगही दिव्याने ही पोस्ट शेअर करताना वापरले आहेत. या व्हिडिओमध्ये दिव्या साडीमध्ये तर मधु धोतीमध्ये सहजपणे बर्फावर सरकताना दिसत आहेत. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. (वाचा - YouTuber ने लाइव स्ट्रीमिंगद्वारे दिलं दारू पिण्याचं चॅलेन्ज; 1.5 लिटर Vodka पिल्यानंतर 60 वर्षीय वृद्धाचा LIVE मृत्यू)

 

View this post on Instagram

 

A post shared by 𝕯ivya 𝕸aiya (@divyamaiya)

 

View this post on Instagram

 

A post shared by 𝕯ivya 𝕸aiya (@divyamaiya)

हा व्हिडिओ शेअर केल्यापासून प्रचंड व्हायरल होत आहे. या अनोख्या स्कीइंग साहसीपणावर नेटीझन्स आपली प्रतिक्रिया देत आहेत. दिव्याने व्हिडिओवर प्रतिक्रिया दिल्याबद्दल नेटीझन्सचे आभार मानले आहेत. दिव्याने सांगितले की, ती मीनवाला मेहता, हरीनी सेकर आणि डॉली जैन यांच्या प्रेरणेने पारंपारिक कपड्यांमध्ये स्कीइंग करण्यासाठी गेली होती.