Devendra Fadnavis Viral Video: देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप; 'त्या' व्हिडिओवरुन नाशिकमध्ये पाच जणांविरोधात तक्रार
Devendra Fadnavis Viral Video ((PC- Facebook Video)

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस (Devendra Fadnavis) यांच्याबाबत एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Devendra Fadnavis Viral Video) झाला आहे. या व्हिडिओमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप आहे. या व्हिडिओ प्रकरणी नाशिक येथे पाच जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच नाशिक जिल्हा दौरा केला होता. या दौऱ्यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या सोशल डिस्टंन्सींगवरुन (Social Distancing) काही कमेंट्स करण्यात आल्या होत्या. या कमेंट्सवरुनच ही तक्रार करण्यात आल्याचे समजते. सोशल मीडियावर व्हायरल (Social Media) असलेल्या या व्हिडिओमध्ये कमेंटही पाहायला मिळत असल्याचे सांगितले जात आहे.

कथीत व्हिडिओबाबत नाशिक रोड पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात ही तक्रार दाखल झाल्याची माहिती आहे. देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक येथील बिटको हॉस्पिटलला भेट दिली. या वेळी त्यांनी कोरोना स्थितीचा आढावा घेतला. देवेंद्र फडणवीस यांनी बिटको हॉस्पिटलला भेट दिली तेव्हा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) हे देथील सोबत होते. या वेळी उपस्थित लोकांमधील काही लोकांनी फडणवीस यांची आक्षेपार्ह भाषेत खिल्ली उडवली होती. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (हेही वाचा, Tekchand Sawarkar Viral Video: आपली निधनवार्ता ऐकून भाजप आमदार टेकचंद सावरकर भडकले; सुखरुप असल्याचा व्हिडिओ शेअर करत, पोलिसात तक्रारही दिली)

दरम्यान, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीद्वारे सत्तेत होते त्यावेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांवर सोशल मीडियातून प्रचंड टीका होत होती. अनेकदा ही टीका आक्षेपार्ह आणि खालच्या भाषेतील असायची. आता राज्यात सत्तांतर झाले आहे. त्यानंतर भाजप नेत्यांवर मोठ्या प्रमाणावर टीका होताना पाहायला मिळाली. सोशल मीडियावर काही नेत्यांबाबत अत्यंत चुकीचा आणि आक्षेपार्ह उल्लेख होत असल्याचे पाहायला मिळत होते. त्याविरोधात भाजप नेत्यांनी पोलिस आयुक्तांची भेट घेऊन तक्रार दिल्याचेही पाहायला मिळाले होते.