Tekchand Sawarka | (Photo Credits: Facebook)

कोराना व्हायरस (Coronavirus) महामारी असतानाही लोकप्रतिनीधी भेटीला येत नसल्याने नागरिकांमध्ये संताप पाहायला मिळत आहे. त्याचा फटका लोकप्रतिनिधींना बसताना पाहायला मिळतो आहे. कामठी विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार टेकचंद सावरकर (BJP MLA Tekchand Sawarkar) यांच्याबाबत अशीच एक घटना घडली आहे. सुरुवातीला आमदार टेकचंद सावरकर (Tekchand Sawarkar) हरवल्याची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यानंतर आता थेट त्यांचे निधन झाल्याचीच पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. 'आमदार टेकचंद सावरकर यांचे निधन झाले असून त्यांना श्रद्धांजली', असा या पोस्टचा आशय आहे. दरम्यान, आपल्याबाबत असी पोस्ट पाहून आमदार टेकचंद सावरकर चांगलेच भडकले आहेत.

सोशल मीडियात आपल्या निधनाची पोस्ट व्हायरल झाल्याचे पाऊन आमदार टेकचंद सावरकर यांनी अज्ञातांविरोधात थेट पोलीस तक्रार दिली आहे. तसेच सोशल मीडियावर एक व्हिडिओ (Tekchand Sawarkar Viral Video) पोस्ट करुन आपण सुखरुप असल्याचेही आमदार सावरकर यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Tanmay Fadnavis Memes: कोरोना लस घेतल्यावर तन्मय फडणवीस सोशल मीडियावर ट्रोल, युजर्सनी मिम्सच्या माध्यमातून उडवली खिल्ली)

आमदार टेकचंद सावरकर यांनी काय म्हटले?

आमदार टेकचंद सावरकर यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओत म्हटले आहे की, 'नमस्कार मी आमदार टेकचंद सावरकर. मला काहीही झालेले नसून सर्व जनतेच्या आशीर्वादाने मी सुखरूप आहे. माझ्या जनता जनार्दनाची सेवा करीत आहे. काही समाजकंटकांनी माझे कोरोनामुळे निधन झालेले आहे, अशा खोट्या बातम्या समाजमाध्यमांवर प्रसारित केल्या आहेत. त्याकडे काही लक्ष देऊ नये. अशाप्रकारच्या बातम्या समाजमाध्यमांवर फेसबूक व्हॉट्सअॅप आणि इतर ठिकाणी प्रसारित करणाऱ्या लोकांची माहिती माझ्या कार्यालयास कळवावी.'

दरम्यान, कोरोना व्हायरस संकट काळात अनेक लोकप्रतिनिधींनी जनतेला वाऱ्यावर सोडल्याची नाराजी जनतेतून आहे. नाराजी व्यक्त करताना नागरिक सांगतात की, जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी धावने हे लोकप्रतिनिधींचे काम आहे. जनता अडचणीत असतान अशा अडचणीच्या काळात जनतेसोबत उभा राहात नाहीत, अशा लोकप्रतिनिधींचा काय उपयोग? असा वालही जनतेतून होताान पाहायला मिळतो.