नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात देशातील विविध ठिकाणी आंदोलने केली जात आहे. या आंदोलनाला हिंसेचे वळण लागले असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून आले आहे. मात्र हे प्रकरण अधिक वाढू नये म्हणून राज्यात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्याचसोबत काही मेट्रो स्थानक सुद्धा बंद ठेवण्यात आली आहेत. परंतु या सर्व परिस्थितीत जामिया मिला इस्लामिया युनिव्हर्सिटीच्या बाहेर मुस्लिम समाजातील व्यक्तींनी आणि विद्यार्थ्यांनी नमाज अदा केला. त्यावेळी अन्य धर्मियातील लोकांनी मानवी साखळी तयार करुन त्यांना संरक्षण दिल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओत असे दिसून येत आहे की, मानवी साखळीच्या आतील बाजूस मुस्लिम धर्मियांकडून नमाज अदा केला जात आहे. तसेच हा नमाज रस्त्यानजीकच केला जात असल्याने कोणत्याही प्रकारचा धक्का त्यांना पोहचू नये म्हणून मानवी साखळीच्या मदतीने त्यांना नमाजासाठी सुरक्षा देण्यात आली आहे.(CAA Protest: नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे दिल्लीत जमाव बंदी लागू, बंगळुरु-मुंबईत हायअलर्ट)
ANI Tweet:
#WATCH Delhi: Students and other people of Muslim community offered Namaz outside the gates of Jamia Millia Islamia university. Members of other faiths formed a human chain around them. pic.twitter.com/FEPZOqI1MX
— ANI (@ANI) December 19, 2019
दिल्लीत पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था म्हणून मथुरा रोड ते कालिंदी कुंज पर्यंत जाणारा मार्ग बंद ठेवला आहे. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील लोक नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसीच्या विरोधात जोरदार आंदोलन करत आहे. तर बंगळुरु आणि मुंबई येथे सुद्धा मोठ्या प्रमाणात आंदोलन होणार असल्यची शक्यता व्यक्त केली जात असून हायअलर्टचा इशारा देण्यात आला आहे. तर डीएमआरसीने जामिया मिलिया इस्लामिया, जलोसा विहार बाग, मुनिरका , लाल किल्ला, जामा मस्जिद, चांदनी चौक आणि विश्वविद्यालय मेट्रो स्थानकातील वाहतूक बंद करण्यास भाग पाडले आहे. त्याचसोबत पटेल चौक, लोक कल्याण मार्ग, उद्योग भवन, आयटीओ, प्रगति मैदान आणि खान मार्केट येथील वाहतूक बंद केली आहे. त्यामुळे प्रवासी मेट्रो स्थानकातून आतमध्ये किंवा बाहेर जाऊ शकणार नाहीत आहे. त्याचसोबत या स्थानकांवर मेट्रो थांबण्यात येत नाही आहेत